"हाच तो मुलगा ठरणार बादशाह", विश्वनाथ आनंद यांची पोस्ट चर्चेत
13-Dec-2024
Total Views | 756
नवी दिल्ली : भारताच्या गुकेश डोम्मराजूने (D. Gukesh) सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गुरूवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी इतिहास रचला आहे. या स्पर्धेत डी गुकेशने विजय मिळवल्यानंतर विश्वनाथ आनंद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी गुकेशचा लहानपणीचा एक फोटो शेअर करत "हाच तो मुलगा ठरणार बादशाह", असे कॅप्शन दिले असून त्यांनी काही वर्षांआधी केलेली भविष्यवाणी आता खरी ठरली आहे.
१८ वर्षीय गुकेशने अंतिम फेरीत डिंग लिरेनला पराभवाची धूळ चारली आहे. आतापर्यंत सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून त्याने जागतिक पातळीवर विक्रम केला आहे. २०१२ साली विश्वनाथन आनंद यांनी विजय मिळवला होता. मात्र आता त्यानंतर गुकेशने विजय मिळवत मानाचा तुरा रोवला आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर आता जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू म्हणून विक्रम केला आहे.
आता त्याच विश्वनाथ आनंद यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये विश्वनाथ आनंद हे गुकेशला सन्मान चिन्ह देताना दिसत आहेत. या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. हाच तो बुद्धिबळ खेळातील बादशाह असल्याचे म्हणत त्यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, क्रीडा क्षेत्रासाठी २०२४ हे वर्ष यशस्वीपणे ठरली आहे. एप्रिल २०२४ मध्ये उमेदवारांची स्पर्धा जिंकत डिंग लिरेनविरोधात २०२४ च्या जागतिक चॅम्पियन्सशिप सामन्यात सर्वाधिक तरूण खेळाडूने विजयी मिळवला आहे. गुकेशने सप्टेंबर २०२४ल रोजी बुडापोस्ट येथे बुद्धिबळ ऑलिम्पिया़डमध्ये भारतीय संघाचा सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकले होते.