लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आमदार आदिती तटकरेंनी ट्विटद्वारे दिली माहिती

    12-Dec-2024
Total Views | 245

aditi tatkare
 
मुंबई : (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
 
काय आहे आदिती तटकरेंचे ट्विट?
 
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
 
एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती." असे आदिती तटकरे यांनी संबंधित ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
 
 
प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलंय?
 
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडुन रील्स, व्हीडीओव्दारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असुन याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे.
 
या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेचे सध्यस्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडुन आपणास कळविण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये या करिता आपण आपलेस्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सदयस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणुन दयावी.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121