नाही नाही म्हणता तोंडघाशी पडलेच; युनुस सरकारचा कबुलीनामा!

बांगलादेशी हिंदुंविरोधात जातीय हिंसाचार झाल्याचे मान्य करावे लागले

    11-Dec-2024
Total Views |

Muhammad Yunus

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (minority hindu violence)
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून हटवल्यानंतर देशातील अल्पसंख्याक हिंदूंना इस्लामिक कट्टरपंथींकडून लक्ष्य करण्यात आल्याचे युनुस सरकारने नुकतेच कबुल केले आहे. त्यांनी हे मान्य केले की, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदुंविरोधात ७९ दिवसांत जातीय हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या आहेत. वास्तविक हा आकडा मूळ घटनांच्या संख्येपेक्षा कमी असला तरी बांगलादेशने अखेर वस्तुस्थिती स्वीकारली असून युनुस सरकार तोंडघाशी पडल्याचे दिसत आहे.

हे वाचलंत का? : बांगलादेशात हिंदूंना रिक्षाचालकांकडून जाच, प्रवाशांना करतात मारहाण

मोहम्मद युनूसचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबरपर्यंत अल्पसंख्याकांशी संबंधित घटनांची ८८ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या घटनांमध्ये ७० जणांना अटक करण्यात आली आहे. ईशान्य सुनमगंज, मध्य गाझीपूर आणि इतर भागात हिंसेच्या नवीन घटनांची नोंद झाल्यामुळे प्रकरणे आणि अटकेची संख्या वाढण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. त्यालाच जोडून काही प्रकरणे वैयक्तिक वादावरून झाल्याचा उल्लेख केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्यानंतर लगेचच बांगलादेशकडून जाहीरपणे हे विधान आले आहे. दि. २२ ऑक्टोबरनंतर घडलेल्या घटनांचा तपशील लवकरच मीडियासोबत शेअर केला जाईल, असे आश्वासन शफीकुल आलम यांनी दिले आहे.