नवी दिल्ली : बशर अल-असाद सरकारला बंडखोर सैन्याने पदच्युत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने सीरियातून ( Syria ) ७५ भारतीय नागरिकांना बाहेर काढले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली आहे.
रात्री उशिरा जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ताज्या घडामोडींनंतर भारत सरकारने ७५ भारतीय नागरिकांना सीरियातून बाहेर काढले आहे. सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर, दमास्कस आणि बेरूतमधील भारतीय दूतावासांनी निर्वासन प्रक्रियेत समन्वय साधला. बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील ४४ यात्रेकरूंचा समावेश आहे, जे सईदा झैनबमध्ये अडकले होते. सर्व भारतीय नागरिक सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत आणि उपलब्ध व्यावसायिक उड्डाणांनी भारतात परततील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.