हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीतून नितेश राणे कडाडले
11-Dec-2024
Total Views | 42
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या अधिकाधिक लाभार्थी या मुस्लिम आहेत. त्यामुळे दोन हून अधिक अपत्य असलेल्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, असे म्हणत नितेश राणे यांनी आपली परखड भूमिका व्यक्त केली आहे. हा तर एक ट्रेलर होता, जर हिंदू एक झाला तर तुम्हाला पिक्चर दाखवेल, असे बांगलादेशातील हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत त्यांनी ११ डिसेंबर २०२४ रोजी हे वक्तव्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
"महायुती सरकारला जे लोक मतदान करतात, जे लोक नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवतात अश्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. जे लोक मोदी नको असे म्हणतात. हिंदुत्ववादी सरकार नको असे म्हणतात, मात्र मुस्लिम समाज आमच्या योजनेचा लाभ घेतो. जर तुमचा धर्म महत्वाचा असेल तर आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ काशाला घेता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की या योजनेच्या अधिकाधिक लाभार्थी या मुस्लिम आहेत. त्यामुळे दोन हून अधिक अपत्य असलेल्यांना या योजनेचा लाभ देऊ नये," असे म्हणत नितेश राणे यांनी आपली परखड भूमिका व्यक्त केली आहे. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, "हा तर एक ट्रेलर होता, जर हिंदू एक झाला तर तुम्हाला पिक्चर दाखवेल, तेव्हा तुम्हाला तुमचा अब्बा आठवेल", असे त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर योजना ठरली आहे. राज्यातील असंख्य महिलांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १५०० रुपयांचा अर्थिक लाभ घेतला आहे. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे केवळ विधानसभा निवडुकीपर्यंत खात्यात येतील असे मतदारांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता, महाविकास आघाडी भुईसपाट झाली असल्याचे दिसून आले.