'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर पहिल्या सोमवारी पास की फेल? जाणून घ्या कलेक्शन
10-Dec-2024
Total Views | 81
मुंबई :सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ : द रुल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अनेक चित्रपटांच्या कमाईचे त्याने रेकॉर्ड मोॉले असून प्रदर्शनानांतरच्या पहिल्या सोमवारी कलेक्शनच्या परीक्षेत पुष्पा २ पास झाला आहे की फेल हे जाणून घ्यायला हवं. ५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट देशभरात तेलुगु भाषेसह हिंदी, तमिळ,कन्नडा, मल्याळम आणि बंगालीत प्रदर्शित झाला. पुष्पा २ या चित्रपटाने जगभरात पाच दिवसांत ९०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'पुष्पा २' चित्रपटाने प्रदर्शनानंतरच्या पहिल्या सोमवारी म्हणजे ९ डिसेंबर रोजी ६५ कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटाच्या तेलुगु भाषेतील चित्रपटाने १४ कोटी, हिंदीने ४६ कोटी आणि तमिळने ३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे देशभरात आत्तापर्यंत या चित्रपटाने ५९३.१ कोटी कमावले आहेत. त्यापैकी हिंदी भाषेत ३३१.७ कोटी आणि तेलुगु भाषेत २११.७ कोटींचा गल्ला जमला आहे.
मात्र, 'पुष्पा २' चित्रपटाला बाहुबली २ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडता आला नाही. 'बाहुबली २' ने प्रदर्शनानंतरच्या पहिल्या सोमवारी ८० कोटींची कमाई केली होती. तर आरआरआर चित्रपटाने ४८.८ कोटींची कमाई केली होती. 'पुष्पा २ : द रुल' मध्ये अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना, फाहद फॉसिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची देखील अधिकृत घोषणा करण्यात आली असून प्रेक्षकांची उत्सुकता आत्तापासूनच वाढण्यास सुरुवात झाली आहे.