प्रार्थना सभेचे कारण सांगत वंचित घटकांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करण्याचा कट
आमचा येशूच खरा देव असे म्हणत हिंदू देव-देवतांचा अवमान
10-Dec-2024
Total Views | 68
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ख्रिश्चन सभेचे आयोजन करून वंचित घटकांना ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्याचा कट उघड झाला. यावेळी हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जात असल्याचे समोर आले आहे. केवळ येशु ख्रिस्त हाच खरा देव आहे असे बोलले जात होते. याची माहिती मिळताच रविवारी ८ डिसेंबर २०२४ रोजी हिंदू संघटना घटनास्थळी पोहोचल्या. तक्रारीनंतर पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
माध्यमांच्या अहवालानुसार, ही घटना मेरठ येथील परतापूर पोलीस ठाणे परिसरात घडली. शंकरपुरी परिसरात विनीत नावाच्या एका व्यक्तीचे घर आहे. विनीतने १० वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मात्र आता तो त्याच्या सभोवताली राहणाऱ्या लोकांनाही धर्मांतरण करण्यास प्रवृत्त करत असल्याचे सांगितले जात आहे, कोणत्याही नोंदणीशिवाय तो गेल्या ५ वर्षापासून आपल्या घराचा चर्च म्हणून वापर करत आहे.
हिंदू संघटनेचे सदस्य आणि किसान मोर्चाशी संबंधित कार्यकर्त्यांना रविवारी विनीतच्या घरी जाऊन माहिती दिली होती. आजूबाजूच्या परिसरातील सुमारे ५०० लोकांना तेथे बायबलचे ज्ञान दिले जात असल्याचे उघड झाले. यामध्ये महिलांचा यात समावेशही होता असे सांगण्यात येते. या मेळाव्याला बाहेरूनही काही लोक आले होते. विनीतच्या घरातील एका हॉलमध्ये ख्रिश्चन प्रार्थना सभा सुरू असल्याचे हिंदू संघटनांच्या लक्षात आले. यानंतर हिंदूंनी यावरोधात आंदोलन सुरू केले.
#मेरठ : थाना परतापुर क्षेत्र के शंकरनगर फेज वन में सैकड़ों लोगों के धर्मांतरण की सूचना पर हिंदू संगठन के कार्यकर्ताओं ने पुलिस के साथ पहुचें। आरोप है कि हिंदू धर्म से ईसाई धर्म में लोगों का कन्वर्जन कराया जा रहा था। पुलिस ने मौके से 8 लोगों को हिरासत में लिया, जिनमें 5 पुरुष और… pic.twitter.com/1jxYPzHR9f
शेतकरी संघटनेशी संबंधित गौरव पराशर यांनी प्रसारमाध्यांना सांगितले की, विनीतच्या घरात निरापराध हिंदूंना त्यांचे आजार बरे करण्यापासून त्यांना नोकरी मिळवून देण्यापर्यंत प्रलोभने दिली गेल्याची माहिती सांगण्यात आली. सभेच्या नावाखाली हिंदू धर्माचा अपमान केला जात असून येशूला खरे देव म्हटले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या ठिकाणी बहुतांश महिला आणि अल्पवयीन मुलांना धर्मांतरणासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणाची माहिती हिंदू संघटनांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी घटनास्थळाचा व्हिडिओ रेकॉर्ड करत पोलिसांनी लोकांचे जबाब घेतले आहेत. सर्व पक्षांना समज देऊन शांत राहण्याचे आवाहन केले. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही ख्रिश्चन साहित्य आणि एक रजिस्टरही जप्त केले गेले नसल्याची माहिती सागंण्यात आली आहे.
दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात केली. पोलीस या प्रकणाचा तपास करतील आणि विनीत कुमारने आतापर्यंत किती लोकांचे धर्मांतर केले आहे. हे शोधून काढणार असल्याचे एसपी सांगतात. यासोबत तो कोणत्या संघटनेथशी संबंधित आहे. लोकांचे धर्मांतरण करण्यासाठी त्याला पैसे कोठून मिळतात हेही कळेल.