मुंबई, दि.९ : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हणजेच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या या दोन्ही राज्यात प्रगतीपथावर आहे. अशावेळी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील आणंद जिल्ह्यात माही नदीच्या साईटवर कामादरम्यान काँक्रीट ब्लॉक पडण्याची दुर्घटना घडली. मात्र या दुर्घटनेनंतर काँग्रेस पक्षाने आपल्या सोशलमिडीया हॅण्डलवरून चुकीची माहिती पसरविली. अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्या काँग्रेसला एनएचआरसीएलने तात्काळ प्रतिसाद देत खडे बोल सुनावले.
दरम्यान, नॅशनल हायस्पीड रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर २०२४ रोजी आनंद जिल्ह्यातील माही नदीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. दरम्यान प्रसारित होत असलेल्या काही वृत्तांमध्ये चुकीची माहिती देण्यात येत आहे. बांधकामाच्या ठिकाणी कोणताही पूल कोसळला नाही; विहीर बुडण्याच्या कामात काँक्रीटचे ठोकळे पडले आणि आधारासाठीच्या पट्ट्या तुटल्या. परिणामी आम्ही तीन मौल्यवान कामगार गमावले आहे आणि एकाला दुखापत झाली. त्यांच्या कुटुंबियांप्रति आमच्या मनःपूर्वक संवेदना आहेत. या प्रत्येक कुटुंबाला २० लाखांची सानुग्रह मदत दिली आहे.
कारण तपासण्यासाठी आणि साइटवर सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिका-यांशी जवळून काम करत आहोत. तसेच, काँग्रेसला सुनावताना एनएसआरसीएलने ट्विट केले की, ब्रिज नाही तात्पुरते स्टील स्ट्रक्चर के टिल्ट झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. तुम्हाला विनंती आहे की, चुकीच्या बातम्या पसरवून प्रकल्पावर काम करणाऱ्या १२ लाख कर्मचाऱ्यांचे मनोधैर्याचे खच्चीकरण करू नका, असे म्हणत प्रसारित चुकीच्या माहितीची नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने पोलखोल केली आहे.