प्रभू श्रीराम यांनी महादेवाचा केला होता अभिषेक आता तिथेच अवैध मशीद
09-Nov-2024
Total Views | 57
बांदा : उत्तर प्रदेशातील बांदा येथे प्रभू श्रीराम यांनी महादेव शंकराचा अभिषेक केला होता आता त्याच ठिकाणी बेकायदेशीर मशीद बांधण्याचे काम केले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने याचा निषेध केला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ती बेकायदेशीर मशीद पाडण्याची मागणी केली आहे. बांबेश्वर नावाच्या एका पर्वतावर असलेले शिवलिंग बामदेव भोलेनाथाचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा आरोप आहे की, कोरोना काळात सर्वत्र ठिकाणी लॉकडाऊन असताना काही कचट्टरपंथींनी या डोंगरावर छुप्या आणि बेकायदेशीर मशीद बांधली होती. विहिंप मंडळाचे अध्यक्ष अशोक म्हणाले की, तेथे अनेक कबरीही बांधण्यात आल्या आहेत. डोंगरावर दररोज नमाजअदा केली जाते आणि दर शुक्रवारी नमाज अदा केली जात असते.
या ठिकाणी कट्टरपंथी लोक नव्हते मात्र आता याठिकाणी मुस्लिमबहुल भाग होऊ लागला आहे. त्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत विश्व हिंदू परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मशीद आणि बेकायदेशीर बांधकामे पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस कॅप्टन तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले गेले आहे.
कट्टरपंथी भारताचे इस्लामीकरण करत असल्याचे पत्रात म्हटले आहे. हे खपवून घेणार नाही, असे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. सरकारने अवैध बांधकाम हटवले नाहीतर बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवला जाईल, अशी हिंदू संघटनांनी मागणी केली आहे.
दरम्यान. संबंधित बांबेश्वर पर्वतावर बांधलेल्या प्राचीन मंदिराचे पुजारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष पुत्तन महाराज यांनीही मशिदीला विरोध केला आहे. ही स्थिती अयोध्या आणि काशी मथुरासारखी होऊ शकते, असे ते म्हणतात. या मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की, प्रभू श्रीरामाने वनवासातील शिवलिंगावर जलभिषेक केला होता.