संविधान भाजपसाठी सर्वोच्च पवित्र राष्ट्रीय धर्मग्रंथ

भाजपचे विधान परिषद गटनेते प्रविण दरेकर यांचे प्रतिपादन

    08-Nov-2024
Total Views | 22
Pravin Darekar

नाशिक : ( Pravin Darekar ) “लोकसभा निवडणुकीत जसा देशात काँग्रेसने आणि राज्यात महाविकास आघाडीने संविधानाचा अपप्रचार केला, तसाच आता विधानसभेलाही अपप्रचार करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत संविधानाचा खोटा ‘नॅरेटिव्ह’ सेट करून राहुल गांधी यांनी जनतेला भ्रमित करण्याचे काम केले. आताही ते हातात संविधानाची प्रत घेऊन त्याचा अपमान करत आहेत. संविधान भाजपसाठी सर्वोच्च पवित्र राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे,” असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये आलेले प्रविण दरेकर यांची गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता भाजपच्या उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी भाजप नाशिक महानगर उपाध्यक्ष व माध्यम विभाग प्रभारी पवन भगुरकर, महानगर प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते व उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख गोविंद बोरसे आणि गणेश कांबळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, “लोकसभेला जनतेची दिशाभूल झाली हे निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. प्रत्येक सभेत महाविकास आघाडीचे नेते हातात संविधानाची प्रत घेऊन संविधानाचा अपमान करताहेत. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी संविधानाचा वापर केला जात आहे. यावर निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्यात यावी.

संविधान भाजपसाठी सर्वोच्च पवित्र राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे, याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी दिली आहे.” याउलट काँग्रेसने सत्ताकाळात तब्बल १०७ वेळा घटनादुरुस्ती करत संविधानाचा अपमान केला. आता संविधानाच्या नावाने खोटी पुस्तिका घेऊन अपप्रचार पसरवण्याचे काम सुरु असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

“विधानसभा निवडणुकीसाठी मविआकडे कोणतेही प्रभावी मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून खोट्या आश्वासनांची खैरात मतदारांवर केली जात आहे. आपल्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात मविआने कोणतेही भरीव काम केले नाही. फक्त घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचे काम केले. राज्याचा विकास ठप्प करण्याचे पाप ठाकरे सरकारने केले. हे महाविकास आघाडीचे सरकार फक्त स्थगिती सरकार आहे,” असा टोलाही यावेळी दरेकर यांनी लगावला. याउलट आपल्या दोन वर्षांच्या काळात महायुती सरकारने रेकॉर्डब्रेक विकासकामे केली. ‘लाडकी बहीण’ या योजनेने मविआचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच या योजनेला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. एकीकडे म्हणतात की, ‘लाडकी बहीण योजना’ फसवी योजना आहे. तर दुसरीकडे मविआच्या जाहीरनाम्यात या योजनेची रक्कम वाढवून तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यात काँग्रेसचे नाना पटोले आणि सुनिल केदार यांचा कार्यकर्ता या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेला आहे,” अशी दुहेरी नीती वापरली जात असल्याचेही दरेकर म्हणाले.

रखडलेल्या १०६ सिंचन प्रकल्पांना गती...

महायुती सरकारने राज्यात १०६ रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्याचे काम केले, तर ठाकरे सरकारने फक्त स हा सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात हातभार लावला, तर परकीय गुंतवणुकीविषयी सांगताना मविआच्या काळात कर्नाटक आणि गुजरात परकीय गुंतवणूक आणण्यात पुढे होते. पण, महायुती सत्तेत आल्यानंतर ५२ टक्के परकीय गुंतवणूक राज्यात आणण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. दोन वर्षांत महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचेही प्रविण दरेकर यांनी यावेळी सांगितले.

‘नवाब मलिक यांना भाजपचे समर्थन नाही’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार नवाब मलिक यांच्या प्रचार रॅलीत गेलेल्या प्रश्नावर उत्तर देताना प्रविण दरेकर म्हणाले की, “नवाब मलिक यांना भाजपचा कोणताही पाठिंबा नाही. तसेच भाजपचे कोणतेही नेते मलिक यांचा प्रचार करणार नाही. अजित पवार यांच्या पक्षाने मलिक यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यावर महायुती म्हणून भाजपने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. मलिक यांना भाजपचे कोणतेही समर्थन नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.”

अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121