आता कुठे गेले काँग्रेसचे सेक्युलॅरीझम? केरळच्या मुख्यमंत्र्यांचा घणाघात
प्रियांका गांधींसाठी जमात-ए-इस्लामी मैदानात
08-Nov-2024
Total Views | 279
तिरुवनंतपुरम : प्रियांका गांधी वाड्रा यांना राजकारणात आणण्यासाठी खटपट करत असताना, केरळ मध्ये मात्र आता एक नवीनच पेच उभा राहिला आहे. केरळचे मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनाराई विजयन यांनी ७ नोव्हेंबर रोजी वायनाड येथे पार पडणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत जमात-ए-इस्लामीच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता काँग्रेसचे सेक्युलॅरीझम कुठे गेलं ? असे म्हणत पिनारयी विजयन यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
फेसबूक पोस्ट करत पिनाराई विजयन यांनी म्हटले की " प्रियांका गांधी जमात-ए-इस्लामच्या पाठिंब्यावर उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे?आपला देशाला जमात-ए-इस्लामीची मूल्यं ठाऊक आहेत का ? त्या संघटनेची विचारधारा लोकशाही मूल्यांशी जुळते का ? वायनाडमध्ये जमात-ए-इस्लामीशी त्यांची युती पाहता काँग्रेस पक्षाच्या सेक्युलॅरीझमवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “जे धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करतात त्यांनी सर्व प्रकारच्या सांप्रदायिकतेला विरोध करू नये का? मुस्लीम लीगसह काँग्रेस आणि मित्रपक्ष जमात-ए-इस्लामीसोबतची युती कायम ठेवण्यासाठी काही ‘त्याग’ करत असल्याचे दिसते. काँग्रेस जमात-ए-इस्लामीची मते नाकारू शकते का? असा तिखट सवाल पिनाराई विजयन यांनी केला आहे. त्याच सोबत ते म्हणाले की जमात-ए-इस्लामी या संघटनेला भारताबद्दल किंवा तिच्या लोकशाही बद्दल तसुभर सुद्धा आदर नाही. जम्मू - काश्मीर मध्ये त्यांच्या अजेंड्या बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पुढे असं सुद्धा म्हणाले की जमात-ए-इस्लामने जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकाळ विरोध करून निवडणुकांद्वारे मजबूत सांप्रदायिक विचार वाढवले आहेत."
पिनाराई विजयन यांच्या मते वायनाड येथील जमात-ए-इस्लामचा तर्क असा आहे की ते काश्मिरी जमात-ए-इस्लामीसारखे नाहीत. तथापि त्यांची विचारधारा मात्र, सारखीच आहे जी कोणत्याही प्रकारचे लोकशाही मानत नाही.त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिवंगत मार्क्सवादी नेते ईएमएस नंबूदीरीपाद यांनी केलेल्या जातीय युतींना विरोध केल्याचे लक्ष्यात आणून दिले.