"फक्त १५ मिनिटे पोलिसांना हटवा कोण किती शक्तीशाली आहे पाहू"
07-Nov-2024
Total Views | 215
छत्रपती संभाजीनगर : एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी १५ मिनिटांचा संदर्भ देत उल्लेख केला. प्रचाराच्या वेळेचा संदर्भ देत ओवैसी म्हणाले की, १० वाजून ४५ मिनिटांची वेळ आहे, यामध्ये अजून १५ मिनिटे शिल्लक आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना ते म्हणाले की, अरे जरा धीर धरा, १५ मिनिटे बाकी आहेत. ना ती आम्हाला सोडते ना ती मला सोडते, असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर ते छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेतून बोलत होते.
याआधी अकबरुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा १५ मिनिटांचा उल्लेख केला. प्रचारावेळी बोलत असता ओवैसी म्हणाले की, १० वाजून ४५ मिनिटांची वेळ आहे, आणखी १५ मिनिटे बाकी आहेत. यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करत असताना ते म्हणाले.
याआधी त्यांनी २०१२ मध्ये १५ मिनिटांबाबतचे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले की, जर तुम्ही १५ मिनिटांसाठी देशातून पोलिसांना हटवले असता शक्तीशाली कोण आहे हे लवकरच समजेल. यावेळी ते म्हणाले की, आम्ही २५ कोटी आहोत, तुम्ही १०० कोटी आमच्यापेक्षा लोकसंख्येने अधिक आहात. केवळ १५ मिनिटे पोलिसांना हटवा, आम्ही सांगू कोणाच्यात किती हिंमत आहे. कोण शक्तीशाली आहे? या केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने ओवैसी यांची निर्दोश मुक्तता केली.