मतदारांशी बोलताना वडेट्टीवारांची शिवीगाळ! भाजपकडून व्हिडीओ ट्विट

    06-Nov-2024
Total Views | 223
 
Vijay Wadettivar
 
मुंबई : मतदारांशी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून काँग्रेसचा हात, मतदारांचा घात, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.
 
 
 
हे वाचलंत का? - कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकरांच्या रथयात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद!  
 
"कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार मतदारांना हरा*खोर म्हणत आहेत. २० तारखेनंतर तुला पाहून घेइन, तुमचे नाव लिहून ठेवले आहेत, अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिटकारा आहे. ज्या काँग्रेसने संविधानाची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली, असंख्य सामान्य लोकांना तुरूंगात डांबून ठेवले ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता मतदानातून काँग्रेसची ही मस्ती नक्कीच उतरवणार," असे भाजपने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचं राफेल विमान पाकिस्ताननं पाडलं का? या प्रश्नावर ए. के. भारती यांनी दिलं उत्तर! म्हणाले, प्रश्न हा...

"भारताचं राफेल विमान पाकिस्ताननं पाडलं का?" या प्रश्नावर ए. के. भारती यांनी दिलं उत्तर! म्हणाले, "प्रश्न हा..."

(India-Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी युद्धविराम देण्यात आला. यानंतर रविवार, दि. ११ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत विस्तृत..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121