राहुल गांधींकडील लाल संविधानाचे पुस्तक कोरेच! भाजपकडून पोलखोल

    06-Nov-2024
Total Views | 155

rah


मुंबई :
संविधानाच्या मारतात बाता, काँग्रेसचा एकूण विषयच खोटा, अशी टीका भाजपने काँग्रेसवर केली आहे. बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलनात उपस्थित झाले होते. यावेळी त्यांच्या हातात नेहमीप्रमाणे लाल रंगाचे संविधानाचे पुस्तकही होते. मात्र, या पुस्तकाचा एक व्हिडीओ भाजपने शेअर केला असून यात हे पुस्तक आतून कोरेच असल्याचे दिसून आले आहे.
 
 
 
हे वाचलंत का? -  "महान संत शरदचंद्रजी पवार यांनी..."; राज ठाकरेंचा हल्लाबोल
 
"संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है. मोहब्बत के नाम पर सिर्फ नफरत फैलाना है," अशी टीका भाजपने काँग्रेसवर केली. तसेच काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. पण राहुल गांधी लक्षात ठेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही, तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल," असा इशाराही भाजपने राहुल गांधींना दिला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात अजून एका वाघाटीचा मृत्यू;

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात अजून एका वाघाटीचा मृत्यू; 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्रा'तील मृत्यूचे सत्र सुरूच

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन प्रकल्पा'तील अजून एका वाघाटीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे (rusty spotted cat kitten died). पिल्लू अवस्थेतील या वाघाटीचा अस्थिभंग झाला होता. या मृत्युमुळे राष्ट्रीय उद्यानातील वाघाटीच्या पिल्लांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून आता केंद्रात केवळ तीन वाघाटी शिल्लक राहिल्या आहेत (rusty spotted cat kitten died). त्यामुळे प्रशासन वाघाटी प्रजनन केंद्रातील उपचार पद्धतींविषयी गंभीर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (rusty spotted cat kitten..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121