जम्मू-काश्मीरच्या कलम ३७० पुनर्स्थापित करण्याला भाजपचा विरोध
सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा
06-Nov-2024
Total Views |
जम्मू-काश्मीर : कलम ३७० (Article 370) मागे घेण्याबाबत काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत भाजप आमदारांनी विरोध दर्शवला. एवढेच नाहीतर भाजप आमदरांनी विधानसभेच्या सभागृहात जय श्रीराम अशा घोषणा दिल्या आहेत. जम्मू-काश्मिर खोऱ्यात ओमर अब्दुल्ला यांचे सरकार आल्याने कलम ३७० मागे घेण्याबाबत ठराव मंजूर केला आहे.
जम्मू-काश्मिरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी कलम ३७० मागे घेण्याबाबत निर्णय घेतला. ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने या प्रस्तावाला पाठिंबा देत विधानसभेत याबाबतीत ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मंजूरी जाहीर केली आहे.
विधानसभेत आणि विधानसभेबाहेर हा प्रस्ताव मांडण्यास भाजपने विरोध केला होता. मात्र आता विधानसभेच्या कामकाजावेळी हा गदारोळ झाला होता. जम्मू-काश्मीर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा म्हणाले की, हा प्रस्ताव आणणे विधानसभेच्या कामकाजामध्ये समाविष्ट नसून ते नियमांचे उल्लंघन आहे.
सुनील शर्मा म्हणाले की, जम्मू-काश्मीर विधानसभा आणि सर्वोच्च न्यायालयाला अधिक महत्त्व आहे. कलम ३७० हटवण्याला दोन्ही ठिकाणाहून मान्यता मिळाली आहे. हा ठराव मंजूर करून विधानसभा शिष्टचाराचा भंग झाल्याचे ते म्हणाले आहेत. एवढेच नाहीतर सभागृहात भाजप आमदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आहेत. एवढेच नाहीतर जम्मूविरोधी अजेंडा नही चलेगा, देशविरोधी अजेंडा नही चलेगा, पाकिस्तानी अजेंडा नही चलेगा, अशा घोषणा दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमाद्वारे समोर आले आहे.