नागपूर : संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, नागपूर आणि बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘संस्कृत बालनाट्य लेखन स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्वलिखित किंवा अनुवादित संस्कृत कथा पाठविता येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या संहितांचे प्रकाशन संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या प्रकाशन विभागातर्फे केले जाईल. त्यासाठी लेखकाची सहमती घेतली जाणार आहे. बालरंगभूमी परिषदेच्या संस्कृत बालनाट्य स्पर्धेत एक प्रयोग सादर करण्याची सहमती सुद्धा लेखक किंवा अनुवादकाकडून घेतली जाणार आहे. स्वलिखित कथांना प्रथम पारितोषिक ३००० रुपये, द्वितीय पारितोषिक २५०० रुपये आणि तृतीय पारितोषिक २००० रुपये असणार आहे. अनुवादित कथांसाठी प्रथम पारितोषिक २००० रुपये, द्वितीय पारितोषिक १५००, आणि तृतीय पारितोषिक १००० रुपये असणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क १०० रुपये आहे. अधिक माहितीसाठी ९८२२५४४४४६ (डॉ. वीणा गाणू), ९९७०१५२७६५ (श्रद्धा तेलंग), ९९६०७४४४८४ (संजय रहाटे) आणि ९८५०३२७७३४ (अनिल देव) या क्रमांकावर संपर्क साधावा.