आक्रमण विदेशी 'तण’वेलींचे

    04-Nov-2024
Total Views | 248
exotic Creepers and Climbers


भारतीय जंगलातील झाडांचे आणि मातीचे उपकार विसरून, अंगाखांद्यावर खेळतोय म्हणत काही विदेशी झुडपे आणि वेलींनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे (exotic Creepers and Climbers). भारतीय झाडांवर विदेशी वेलींची चढलेली आच्छादने मन विषण्ण करत आहेत (exotic Creepers and Climbers). या वनस्पती जंगल अक्षरशः खात आहेत (exotic Creepers and Climbers) . भारतातून त्यांच्या घरी हे परत न गेलेले पाहुणे असंख्य आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या काही विस्तीर्ण अशा वनपट्ट्यांना सतावणार्‍या विदेशी ‘तण’वेलींविषयी या लेखातून जाणून घेऊया. (exotic Creepers and Climbers)


भारतीय खंडाला परकीय आक्रमणे काही नवीन नाहीत. मध्यपूर्वेतील राज्यकर्त्यांनी शतकानुशतके ही परंपरा पाळली. ती आजही वेगवेगळ्या माध्यमांतून चालूच आहे. अशीच काहीशी आक्रमणे वनस्पतीच्या राज्यातही झाली आहेत. भारतीय किंवा देशी वनस्पतींसोबत आपण भारतीय लोक आणि भारतीय पशु-पक्षीवर्ग वाढला. थोडक्यात, त्या त्या देशातील वनस्पतींसोबत तिथले लोक, पशुपक्षी, कीटकवर्ग विकासाची पाऊले सर करत असतात. हा फरक निसर्गशास्त्रानेच आखून दिलेला आहे. आपण तो निसर्गाच्या निर्णयाचा आदर राखून अबाध्य ठेवला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही.

प्रत्येक देश हा आपल्या देशात दुसर्‍या देशाची वनस्पती शक्यतो पाय ठेवणार नाही, याची काळजी घेत असतो. परंतु, भारतात ‘आओ जाओे घर तुम्हारा’ अशी थोडीशी आदरातिथ्यशील माणुसकीची भावना असल्याने भारतात आयात होणार्‍या तर्‍हेतर्‍हेच्या शेतमालामधून विशिष्ट आणि अदेशी वनस्पती भारतीय जमिनीवर पाय ठेवतात. भारताची माती अशा वनस्पतींना हातपाय पसरायला ओसरी देते. पोषक हवामान लाभल्याने त्या इथल्याच बनतात आणि विक्राळ रूप धारण करतात. काही वेळेस काही वनस्पती एखाद्या कामासाठी म्हणून आणल्या जातात. तिच्या व्याप्तीबाबत अभ्यास न केल्याने त्या वनस्पतीचे दुष्परिणाम भारतीय जंगलांवरती दिसू लागतात. जंगलातील झाडांचे, मातीचे उपकार विसरून ही विदेशी झुडपे आणि वेली आपले रंग दाखवू लागतात. अशी असंख्य झाडे आहेत. ती भारतातून माघारी गेलीच नाहीत. मात्र, आता सह्याद्री आणि इतर छोट्या-मोठ्या उपरांगांमध्ये त्यांनी आक्राळ-विक्राळ रुप धारण केले आहे.

रान तुळशीचे प्रकार ( Hyptis spp.), रानभेंडी ( Malachra sp.) वेगाने वाढताना दिसत आहेत. 2021-22 मध्ये आपल्याकडे न आढळणार्‍या यामधील काही प्रजाती आता मोठ्या प्रमाणावर बर्‍याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वनविभागानेदेखील मिकानिया, रानमोडीचा बंदोबस्त किमान त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रमुख संवेदनशील झोन अंतर्गत केला तरी भविष्यातील जंगली विद्ध्वंसाला आळा बसेल. भारतात आयात जनावरांच्या खाद्यातून, अंगाला चिकटून, मलातून किंवा आयात धान्य खाद्यातून किंवा कंटेनर्समधून एखाद्या तणाचे आगमन भारतात होतेच आणि इथल्या पोषक वातावरणानुसार त्याचा राक्षस होतो. जो नंतर आपण नियंत्रणात आणू म्हटले, तरी आणता येत नाही. त्यामुळे भारताचे सुजाण शहरी नागरिक, तसेच शेतकरी मिळून पुढे उल्लेखलेल्या वनस्पती नष्ट करण्यामध्ये हातभार लावूया. आपल्यासाठी हीच नवीन वर्षाची आणभाक असेल.
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत.)
 

 


गारवेल
(शास्त्रीय नाव- Ipomoea cairica)
‘मॉर्निंग ग्लोरी’ या वर्गातील बहुतांश वनस्पती या शोभेच्या वनस्पती म्हणून लावल्या जातात, तर काही तणवर्गातदेखील गणल्या जातात. तण म्हणून आलेल्या बहुतांश ‘मॉर्निंग ग्लोरी’ वेली या अमेरिकेतूनच भारतामध्ये आलेल्या आहेत. गुलाबी, सफेद किंवा इतर रंगांची फुले सकाळी लवकर फुलतात. म्हणून या वर्गातील वनस्पतींना ‘मॉर्निंग ग्लोरी’ असे नाव दिले गेले आहे. यातील गारवेल किंवा आयपोमिया कैरीका किंवा रेल्वे क्रीपर ही वेलवर्गीय वनस्पती आता प्रचंड प्रमाणामध्ये पसरलेली आढळून येते. रेल्वेमधून येणारे धान्य हा या वनस्पतीच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत असावा. कारण नावाप्रमाणेच रेल्वे स्थानकाच्या जवळपास ही प्रजात सुरुवातीला आढळून आली. मात्र, आता सर्वत्र जसे विजेचे खांब किंवा मोठी झाडे आणि सह्याद्री वन अधिवासामध्येदेखील गारवेल सहज आढळून येते. मुळांद्वारे, बियांद्वारे, प्राण्यांच्या अंगाला बिया चिकटून या वनस्पतीचे प्रसारण होते. तुटलेली फांदीदेखील पावसाळ्यामध्ये सहज रुजून नवीन झाड तयार होते. यातील काही वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असले तरी, या वेलींचा माणसाला थेट काहीच उपयोग नाही. कोयना, कुंभार्ली घाट, आजरा, चांदोलीसारख्या ठिकाणी ही वनस्पती फोफावल्याचे दिसून येते.
 
 
कडू वेल/चायनीज क्रिपर
(शास्त्रीय नाव - Micania micrantha)
‘माईल अ मिनिट’ असे इंग्रजी नाव असणार्‍या या वनस्पतीच्या नावारूनच अंदाज येईल की, हिची वाढ किती वेगाने होत असेल. अमेरिकेतील ‘सूर्यफूल’ वर्गातली ही वेल गेली काही वर्षे जंगलातील झाडांवर आच्छादन घातल्यासारखी पसरलेली दिसते. झाडांना विळखा घालून त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश बंद करण्यासाठी ही वेल कुप्रसिद्ध आहे. दुसर्‍या महायुद्धात छोटे पाण्याचे स्रोत, रणगाडे आणि इतर वस्तूंना झाकण्यासाठी (Camouflage) ही वेल भारतात आणली गेली. काही ठिकाणी चहा, रबरच्या मळ्यात जमिनीची धूप थांबवण्यासाठी या वेलीचा वापर झाला. काही ठिकाणी शेतकरी शेतमाल पॅक करण्यासाठी या वेलीचा वापर करताना दिसतात. हे या वेलीच्या प्रसाराचे एक मुख्य कारण आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा आंबा, आजरा, आंबोली आणि त्या ओळीतील बर्‍याच प्रदेशांमध्ये या वेलींचे आच्छादन बघायला मिळते.
 
 
रानमोडी
(शास्त्रीय नाव- Ipomoea cairica)
सूर्यफूलवर्गातील बाहेरून आलेल्या अनेक तणांपैकी हे सगळ्यात वेगाने वाढणारे तण. 2000 सालापासून थोड्या प्रमाणात घाटात दिसणारी ही वनस्पती आता टेरेस गार्डनमधल्या कुंडीतसुद्धा उगवलेली दिसून येते. याच्या पानांना एक विशिष्ट उग्र वास असतो. रानमोडीच्या पानांमध्ये नत्राचे (छळीीेंसशप) प्रमाण इतर झाडांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही वनस्पती खताचा उत्तम स्रोत आहे. बिया तयार होण्यापूर्वी ही झुडपे तोडून शेतात सरींमध्ये मातीआड केली, म्हणजे नत्र स्थिरीकरण व्यवस्थित होताना दिसून येते. या कारणामुळे या तणाचा नायनाटदेखील एका प्रकाराने होऊ शकतो. या वनस्पतीच्या बिनबियाच्या फांद्या गोठ्याभोवती किंवा शेतबांधावरती योग्य प्रमाणात धुपवल्या, तर डास कमी होताना दिसून आलेले आहेत.

उपाय काय?
अशा आक्रमक वनस्पती वेली दिसताच मुळासकट उपटून टाकाव्या.
या वनस्पतींना फुले येण्याआधीच त्या काढून हिरवळीचे खत म्हणून शेतामध्ये वापराव्या.
मिकानियाचे जैविक नियंत्रण हे ‘लायोथ्रीप्स मिकानी’ नावाचे मावावर्गीय रसशोषक किडे करू शकतात.
‘कोनेक्सा गॉल फ्लाय’ या माशा रानमोडीचे नियंत्रण करू शकतात.
‘पक्सीनिया’सारख्या बुरशींचे प्रकारदेखील मेकानिया आणि रानमोडीला नष्ट करत असल्याचे आढळले आहे.
गरज असेल तरच तणनाशकासारख्या उपायांचा वापर करावा.
 
- रोहन पाटील
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत) 
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121