लिएंडर पेस स्थापित 'फ्लाइंग मॅन व्हेंचर्स'च्या सीईओपदी अपूर्वा सरकार यांची नियुक्ती!

    30-Nov-2024
Total Views | 23
apurva sircar appointed fmv ceo


मुंबई :       लिएंडर पेस स्थापित 'फ्लाइंग मॅन व्हेंचर्स'च्या सीईओपदी अपूर्वा सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंधन बँकेच्या विपणन प्रमुखपदी असलेल्या अपूर्वा सरकार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामासंदर्भात सरकार यांनी लिंक्डइन या उद्योग व वाणिज्य क्षेत्राशी निगडीत वेब पोर्टलवर एक पोस्ट केली आहे. अपूर्वा सरकार आता नव्या जबाबदारीत दिसून येणार असून क्रीडा तंत्रज्ञान कंपनी 'फ्लाइंग मॅन व्हेंचर्स'च्या सीईओपदी नेमणूक करण्यात आली आहे.


हे वाचलंत का? -     रिलायन्स डिजिटलची ग्राहकांसाठी विशेष ऑफर; 'ब्लॅक फ्रायडे सेल' अंतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा वापरण्याचे आवाहन


सरकार यांच्याकरिता खेळ आणि फिटनेसच्या माध्यमातून जगाला एक चांगले स्थान बनविण्याच्या दृष्टीने अतुलनीय कामगिरीची संधी असणार आहे. विपणन प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपूर्वा सरकार यांनी पोस्टच्या माध्यमातून भाष्य केले आहे. ते म्हणाले, व्यासायिक क्षेत्रात सात वर्षे कार्यरत असताना मी सर्वोत्तम व्यावसायिक कामगिरी केली. खरतरं, मला याची अपेक्षा नव्हती कारण मी स्वतः बंधन बँकेच्या यशस्वितेसाठी दोन वर्षे दिली.

ते पुढे म्हणाले, “माझ्यासाठी पुढे काय आहे? असे सांगत मैदानावर वास्तविक प्रभाव निर्माण करण्यासाठी व्यवसाय चालविणाऱ्या एका लीजेंड समवेत कारकीर्दीत सामील होण्यास उत्सुक आहे, अशा भावना अपूर्वा सरकार यांनी व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे बंधन बँकेच्या कामगिरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अपूर्वा सरकार क्रीडा जगतात आपल्या व्यावसायिक कौशल्याची चुणूक दाखविण्यास सज्ज झाले आहेत.




अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121