'सीज द शीप!' पवन कल्याणच्या एका निर्णयाणे अख्खा सोशल मिडिया हादरला

    30-Nov-2024
Total Views | 111

Seize The Ship - Pawan Kalyan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Seize The Ship Pawan Kalyan) 
'सीज द शीप' हा सध्या सोशल मिडियावर ट्रेंडिंग विषय झाला आहे. याचे मुख्य कारण आहे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण. त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून संपूर्ण सोशल मिडिया हादरल्याचे दिसत आहे. पवन कल्याण शुक्रवारी काकीनाडा बंदरात पोहोचले. तेथे त्यांनी पीडीएससाठी तांदळाची तस्करी उघडकीस आणली. याबाबत त्यांनी केवळ सोशल मीडियावर पोस्टच केली नाही तर राष्ट्रहिताशी संबंधित मुद्देही मांडल्याचे पाहायला मिळाले. याच दरम्यान त्यांना ज्या जहाजावरून ही तस्करी होत होती, ते जहाज सीज करण्याचा थेट निर्णय घेतला. त्यामुळे पवन कल्याण यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

हे वाचलंत का? : "... तर देशात स्फोटक परिस्थिती निर्माण होईल!"

पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर सांगितले की, मी पीडीएस तांदळाच्या अवैध तस्करीची चौकशी करण्यासाठी काकीनाडा बंदरात पोहोचले होते. हा घोटाळा पूर्वी खूप वाढला होता आणि अद्यापही सुरूच आहे. आज पीडीएस तांदळाची तस्करी होत आहे आणि उद्या स्फोटके किंवा आरडीएक्स येऊ शकतात.आपल्या देशात मुंबईत बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रहितासाठी आपल्याला कठोर पावले उचलावीच लागतील.



६४० टन पीडीएस (सार्वजनिक वितरण प्रणाली) तांदूळ जप्त केल्यानंतर, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. पवनने स्थानिक प्रतिनिधींना या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आणि अधिकाऱ्यांना “जहाज ताब्यात घेण्याचे” आणि तस्करीच्या कारवायांमागील व्यक्ती शोधण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून सुरक्षेतील त्रुटी दूर करून दोषींना शिक्षा करण्याचे आश्वासन दिले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121