गोंदिया - सारस पक्ष्यावर बसवले ट्रान्समीटर; महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

    30-Nov-2024
Total Views | 136
sarus bird
 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यात 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) गोंदियातील सारस पक्ष्यांवर अभ्यास करण्यासाठी मादी सारस क्रेन पक्ष्यावर 'जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर' बसवले (tagged Sarus Crane). यामाध्यमातून सारस पक्ष्यांचा वावर, स्थलांतर अशा बाबींवर अभ्यास केला जाणार आहे (tagged Sarus Crane). महाराष्ट्रात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सारस पक्ष्याचे वास्तव्य असून महाराष्ट्रात प्रथमच सारस पक्ष्यांवर ट्रान्समीटर लावून त्यांच्या अभ्यास करण्यात येत आहे. (tagged Sarus Crane)
 
 
वन विभाग आणि 'सस्टेनिंग एनव्हायरमेंट अँड वाईल्डलाईफ असेंबलाज' (सेवा) या संस्थेने २०२४ साली केलेल्या सारस गणनेनुसार महाराष्ट्रात केवळ ३२ सारस पक्ष्यांचा अधिवास आहे. ही संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सारस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. सध्या सारस पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू आहे. धानाच्या म्हणजेच भातशेतीमध्ये हे पक्षी आपले घरटे बांधतात. ही संधी साधून 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञांनी १२ ते १५ नोव्हेंबर रोजी गोंदियात तपशीलवार सर्वेक्षण करुन सारस पक्ष्याचा मागोवा घेतला. त्यामधील वीण हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करुन दोन पिल्लांसोबत फिरणाऱ्या सारसच्या जोडी हेरण्यात आली. 'बीएनएचएस'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. सथियासेल्वम यांच्या मार्गदर्शनाखाली या जोडीमधील मादी सारस पक्ष्याला गेल्या आठवड्यात पकडण्यात आले. तिच्या पाठीवर 'जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर' बसवून पायात सांकेतिक क्रमांक असणारी रिंग लावण्यात आली. याशिवाय दोन पिल्लांना पकडून त्यांच्या पायातही सांकेतिक क्रमांक असणारी रिंग लावण्यात आली.
 
 
ट्रान्समीटर आणि रिंग लावलेल्या सारस पक्ष्याच्या या कुटुंबाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती 'बीएनएचएस'चे संचालक किशोर रिठे यांनी दिली. सध्या हे कुटुंब गोंदियामध्येच वावरत आहे. हे काम करण्यासाठी मुकुंद धुर्वे, पक्षी पकडणारे ट्रॅपर्स शिवकुमार आणि कन्नडसन यांनी मोलाची कामिगिरी केली.
 
 
 
 
'जीपीएस- जीएसएम' यंत्रणा म्हणजे काय?
पक्षी स्थलांतर अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पक्ष्यांवर लावले जाणारे उपकरण त्यांच्या वजनाच्या २ टक्के असणे अपेक्षित आहे. ’जीपीएस’ आणि ’जीएसएम’ यंत्राचे वजन हे अनुक्रमे ३.५ ग्रॅम आणि १० ग्रॅम असते. त्यामुळे हे उपकरण लावण्यासाठी मोठ्या पक्ष्यांची निवड केली जाते. या दोन्ही उपकरणांमुळे वायरलेस पद्धतीने पक्ष्यांच्या स्थलांतरादरम्यानची माहिती संशोधकांना मिळते. ’जीपीएस’ उपकरणामुळे पक्ष्याचा स्थलांतरादरम्यानचा वेग, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक स्थानाची माहिती मिळते, तर अत्याधुनिक ’जीएसएम’ उपकरणामुळे वर नमूद केलेल्या तीन गोष्टींबरोबरच स्थलांतरादरम्यानचा कोनीय वेग, वार्याचा दबाव, स्थलीय चुंबकत्व, प्रकाशाची तीव्रता आणि तापमानाची माहिती मिळण्यास मदत होते. सौर उर्जेवर हे उपकरण चालते. नेटवर्क न मिळाल्यास त्या ठिकाणांचे संचयन करुन नेटवर्क आल्यानंतर ती माहिती ही यंत्रे संशोधकांपर्यंत पोहोचवतात.
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121