महायुतीच्या विजयात वारकरी संप्रदायाचे अमूल्य योगदान

कीर्तनकार, प्रवचनकारांचा धर्मासाठी मतदान करण्याचा प्रचार

    27-Nov-2024
Total Views | 50
Warkari

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ( Mahayuti ) विजयामागे अनेकांचे सुप्त हात होते, तर काही संघटना, संप्रदाय प्रत्यक्ष मैदानात उतरून धर्मजागरणासाठी प्रचार करत होते. त्यांपैकी वारकरी संप्रदायाने महायुतीच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. साधी राहणी, मुखामध्ये श्री विठ्ठलाचे नाव कोणाच्या आल्यात नाही की गेल्यात नाही, ही वारकरी संप्रदायाची ओळख. मात्र, या निवडणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचे वेगळेच रुप पाहायला मिळाले.

‘विंचू देव्हार्‍याशी आला। देवपूजा नावडे त्याला। तेथे पैजाराचे काम। व्हावे अधमासी अधम॥’ या संतांच्या शिकवणीचा यथायोग्य वापर वारकरी संप्रदायाने या निवडणुकीमध्ये केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महायुतीच्या विजयामध्ये हातभार लागल्याचे चित्र आहे.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा घाट विरोधकांकडून घातला गेला. मुस्लीम आरक्षणाच्या नावाखाली सज्जाद नोमानी दिल्लीवरून मुंबईत डेरेदाखल झाला. त्याने मुस्लिमांना एकगठ्ठा मतदानाच्या नावाखाली ‘व्होट जिहाद’चा बुलंद नारा दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी पक्षांकडूनही ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा देण्यात आली होती. ही घोषणा तळागाळापर्यंत नेऊन जनमानसांत रुजवण्याचे कार्य वारकरी संप्रदायातील कथाकार, निरुपणकार आणि कीर्तनकार यांनी केले. हिंदू म्हणून मतदान करण्याचा संदेश समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्यात या संप्रदायाचा सिंहाचा वाटा आहे.

त्यामुळेच ‘व्होट जिहाद’ विरुद्धची व्यापक जनजागरुकता अल्पावधीतच राज्यभरात झाली. यामुळे हिंदू म्हणून मतदान करण्याची सामाजिक मानसिकता निर्माण होण्यास हातभार लागला. त्याचा परिणाम थेट मतपेटीवर होताना दिसला. राज्यातील 38 ठिकाणी मुस्लीम मतदार हे एकूण मतदारसंख्येच्या २० टक्के आहेत. अशा ठिकाणी यावेळी भाजपला १४ जागी विजय मिळवता आला. २०१९ मध्ये ही संख्या ११ एवढीच होती. मात्र, काँग्रेसचे संख्याबळ मात्र ११ वरून पाचवर आले. गोंदियाची जागा आजवर कधीही काँग्रेसकडून घेणे शक्य झाले नव्हते, अशा ठिकाणी भजपने ६० हजारांपेक्षा अधिकमताधिक्याने विजय मिळवला.

महायुतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासूनच वारकरी संप्रदायाच्या वारीमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, तसेच वारकरी संप्रदायाची वारी निर्धोक पार पडेल, यासाठी प्रयत्न केले होते. महायुतीच्या काळातही वारकर्‍यांच्या सोयीसाठी आणि शाश्वत विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देण्यात आले होते, तर दुसरीकडे मविआतील ज्येष्ठ नेते वारकरी संप्रदायासाठी पूजनीय असलेल्या भगवंतांविषयी अद्वातद्वा भाष्य करण्यात धन्यता मानत होते. त्यामुळे धर्मासाठी पुन्हा जागृती करण्याच्या उद्देशाने अनेक वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार यांनी त्यांच्या कीर्तन, प्रवचनातून धर्मासाठीचे मतदान करण्याचे महत्त्व आणि ‘व्होट जिहाद’चा धोका दोन्हींची ओळख करून दिली. त्याची परिणीती म्हणजेच महायुतीचा विजय होय.

धर्माचे पालन। करणे पाखंड खंडन॥
हेचि आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम॥

धर्मरक्षणासाठी आपण सदैव उभे राहणे प्रत्येक वारकर्‍याचे कर्तव्यच. त्या कर्तव्याला अनुसरून संप्रदायातील प्रत्येक वारकर्‍याने, कीर्तनकाराने, प्रवचनकाराने आणि फडकर्‍याने या सर्वांनीच आपापली भूमिका योग्य प्रकारे या विधानसभेमध्ये निभावली. हिंदू धर्मरक्षणासाठी, हिंदूहितासाठी हिंदू समाजाचे मतदान व्हावे, यासाठी गावोगावी कीर्तन प्रवचन बैठकांच्या माध्यमातून प्रबोधन केले गेले. त्यासोबतच समाजमाध्यमांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत आपापले संदेश सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ, प्रतिष्ठित अशा कीर्तनकार, प्रवचनकार, संत-महंतांनी पोहोचवले. त्याचाच परिपाक की, ‘न भूतो न भविष्यति’ असे मतदान विधानसभेमध्ये झाले आणि हिंदूहितवादी सरकार पुनश्च एकदा सत्तेमध्ये आले.

हभप शिरीष महाराज मोरे (देहुकर)
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज


अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121