‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्र सरकारची देशातील संशोधक विद्यार्थ्यांना भेट

    27-Nov-2024
Total Views | 74
Modiji

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ ( ONOS ) या योजनेला मंजुरी दिली असून त्याचा फायदा देशातील अनेक विद्यापीठे, महाविद्यालयांना होणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

केंद्र सरकारने देशात ‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ ही योजना कार्यान्वित करण्याचे ठरवले असून या योजनेला मंत्रिमंडळानेदेखील मंजुरी दिली आहे. देशात अनेक ठिकाणी संशोधने सुरू असतात. ही संशोधने काही जर्नलमधून प्रकाशित केली जातात. मात्र, देशातील प्रत्येक विद्यापीठ अथवा महाविद्यालयातील संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंत संशोधनातील ही प्रगती पोहोचतेच, असे नाही. त्यामुळे संशोधनाला गती देण्यासाठी तसेच संशोधनाचा देशात सर्वदूर प्रसार करण्यासाठी ‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ योजनेची घोषणा केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत

मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

लोकसभेत १२ तासांबून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता. Waqf Board misuse of ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121