जागतिक बाजारातील हालचालींचा सोने दरावर परिणाम; जाणून घ्या आजचा भाव
27-Nov-2024
Total Views | 281
नवी दिल्ली : दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने दरात वाढ दिसून आली आहे. सोन्याचा भाव एमसीएक्सवर ७६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका राहिला आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव १,२०० रुपयांनी वधारला असून ७६ हजार रुपये प्रति तोळा पुढे गेला आहे. विशेष म्हणजे काल मंगळवारी सोन्याचा दर ७४,८५२ रुपये प्रति तोळा इतका कमी झाला होता.
दरम्यान, सलग २ दिवसांच्या घसरणीनंतर आज बुधवार २७ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळाली. त्याचबरोबर, देशांतर्गत बाजारात सोने १,२०० रुपयांनी वधारले असून MCX वरील बाजारभाव ७६,०७८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली. सोने दरावर नजर टाकल्यास गेल्या आठवड्यात ७७,६८५ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला होता.
जागतिक बाजारात सोन्याच्या दरात झालेली वाढ पाहता देशांतर्गत बाजारात सोन्याचे भावदेखील वधारले आहेत. अमेरिकन डॉलर कमजोर झाल्याने सोन्याच्या भावाला मोठा आधार मिळाला आहे. उलटपक्षी डॉलरच्या मजबूतीमुळे इतर चलनांमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होते. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या कमजोरीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीला काही प्रमाणात आधार मिळाला आहे. रुपया कमजोर झाल्यामुळे सोन्याची आयात महाग होते. आजच्या व्यवहारादरम्यान, रुपया ८४.४४ डॉलरच्या नीचांकी पातळीवर घसरला.