"महायुतीच्या विजयामागे...", एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

    27-Nov-2024
Total Views |

shinde
 
मुंबई : (Eknath Shinde) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने तब्बल २३२ जागांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीच्या या विजयानंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार दि. २७ नोव्हेंबर प्रथमच पत्रकार परिषद घेतली.
 
यावेळी त्यांनी सरकार स्थापनेपासून जनतेच्या मिळालेल्या प्रेमापर्यंत सगळ्या गोष्टींवर मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शिंदे यांनी महायुतीच्या विजयाची दोन महत्वाची कारणे सांगितली आहेत.
 
महायुतीच्या विजयामागे 'या' दोन गोष्टींचा मोलाचा वाटा
 
एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीच्या विजयामागे दोन गोष्टींचा मोलाचा वाटा आहे. एक म्हणजे कल्याणकारी योजना आणि दुसरं म्हणजे आम्ही केलेली विकासकामे. महायुतीने राबवलेली माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याची चर्चा आहे. मला कुठलाही पदापेक्षा सख्या भाऊ हे पद मोठे वाटते. विरोधक आपला पराभव ईव्हीएममुळे झाल्याचे सांगत आहेत. मात्र, जेव्हा ते विजयी होतात तेव्हा त्यांना ईव्हीएमची आठवण येत नाही. लोकसभेत ईव्हीएममध्ये नव्हते का?" असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे.