विरोधकांनी रडीचा डाव न खेळता मोठ्या मनाने पराभव स्वीकारावा

भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकरांनी सुनावले

    26-Nov-2024
Total Views | 41
Pravin Darekar

मुंबई : ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या विरोधकांना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. विरोधकांनी आता रडीचा डाव खेळू नये.

लोकशाहीत जय पराजय होत असतात. विरोधकांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारावा, असा सल्ला दरेकर यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या ईव्हीएमच्या मुद्द्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, विरोधकांनी आता रडीचा डाव खेळताना दिसताहेत. कर्नाटकमध्ये जिंकले त्यावेळी ईव्हीएमवर संशय नव्हता. झारखंडला जिंकले तिथे हेच ईव्हीएम होते आणि लोकसभेला निवडणुका झाल्या त्या ईव्हीएमवरच झाल्या. मतदारांनी कौल दिल्यानंतर लोकशाहीत जय पराजय होत असतात, आपण मतदारांच्या कौलाचा सन्मान करण्याची गरज आहे. आरोप करणाऱ्यांनी, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनी आपापल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि आपली भूमिका मांडावी. रडीचा डाव खेळू नका,मोठ्या मनाने पराभव स्वीकारा. लोकशाहीत जय पराजय होत असतात, असा टोलाही दरेकरांनी विरोधकांना लगावला.

उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना दरेकर म्हणाले की, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कुणी कुणाला संपवत नसतो, जो-तो आपल्या कर्माने-कृतीने संपत असतो. पक्षाला अपयश आले म्हणजे संपले असे काही नाही. त्यांनी मेहनत घेऊन पुन्हा पक्ष उभा करावा, राजकारणात यश अपयश येतच असते. आमच्या पक्षाने लोकसभेला महाराष्ट्रात अपयश पाहिलेय. आम्ही खचून न जाता काम केले, जनतेचा विश्वास संपादित केला. फक्त फेसबुक लाईव्ह केले म्हणजे जनता स्वीकारते असे नाही.
दरेकर पुढे म्हणाले की, दुधाला अनुदान देण्याचे काम आमच्या सरकारने केले होते. जयंत पाटील, बंटी पाटीलचा दूध संघ आहे म्हणून राजकीय सुडाने कुठलीही कारवाई करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलेय विरोधी पक्षांच्या चांगल्या सूचना आम्ही स्वीकारू, सुडाने कुठल्याही प्रकारचे राजकारण होणार नाही. पण काही राजकीय नेते सुडाने वागले आणि त्याचा सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादकांना त्रास झाला तर त्याची योग्य ती दखल घेऊन सरकार कारवाई करेल.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121