‘आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून लोकहिताची कामे होतच राहतील’

    25-Nov-2024
Total Views | 46
Ramsheth Thakur

पनवेल : “आमदार प्रशांत ठाकूर ( Prashant Thakur ) यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आहे. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यापुढे विजयाचा षटकारही मारणार आहेत,” असा ठाम विश्वास माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. पनवेल विधानसभेचे नेतृत्व करताना आमदार प्रशांत ठाकूर जबाबदारीने काम करीत आहेत. त्यामुळे वडील म्हणून आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रामशेठ ठाकूर म्हणाले की, “भाजप प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः हे देशाच्या विकासाचे मूळ उद्दिष्ट्य घेऊन काम करीत आहे. या विचारधारणेतून आमदार प्रशांत ठाकूर नेहमीच काम करतात. सर्वसामान्यांचा विचार त्यांच्या कार्यातून दिसत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघाचा विकास आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी त्यांनी कायम उचलली आहे. प्रत्येक समाजातील वर्ग आमदार ठाकूर यांना मानतो. त्यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकीने नाळ जोडली गेली आहे. आमदार ठाकूर पनवेलच्या विकासासाठी काम करीत असतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःला या कार्यात झोकून दिले आहे.

पनवेलचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सुटणार

चारवेळा निवडून येणे हे सहज नसते. लोकांची कामे केल्यानंतरच हे यश मिळत असते, असे माजी खा. रामशेठ ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले. आमदार ठाकूर या मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहिले आहेत. पनवेलच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न येत्या वर्षात कायम स्वरुपी सुटणार आहे आणि त्यासाठी आमदार ठाकूर यांनी घेतलेले कष्ट कामी येत असल्याचे ते म्हणाले.

पनवेल हा राज्यातील सर्वात मोठा दुसर्‍या क्रमांकाचा मतदारसंघ
 
“पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासकामांवर भर दिला. त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची विकासकामे झाली. पनवेल विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वात मोठा दुसर्‍या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे प्रचाराच्यावेळी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे तसे कठीणच आहे. मात्र, आमदार ठाकूर विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले आहेत,” असे रामशेठ ठाकूर म्हणाले. महायुतीच्या सर्व पदाधिकार्‍यांचे व कार्यकर्त्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

अग्रलेख
जरुर वाचा
जोधपूरमधून गेल्या ४८ तासांत

जोधपूरमधून गेल्या ४८ तासांत 'लव्ह जिहाद'ची तिसरी घटना उघड! स्नॅपचॅटवर अल्पवयीन मुलीला हिंदू असल्याचे भासवत प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

(Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती...

दरवर्षी २१ एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा!

दरवर्षी २१ एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा!

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'चित्रपताका' या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121