मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Waqf Hatao, Annadata Bachao) कर्नाटकसह देशभरातील मालमत्तेवर वक्फ बोर्ड ज्या वेगाने मनमानीपणे दावा करत आहे, त्याविरोधात लोक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. कर्नाटकच्या कलबुर्गी भागात नेगीलयोगी स्वाभिमान वेदिकेच्या बॅनरखाली राज्यातील मठाधिपती, हिंदू संत, भाजपा नेते आणि शेतकरी समर्थक संघटनांच्या सदस्यांनी "वक्फ हटाओ, अन्नदाता वाचवा" अशी घोषणाबाजी करत तीन दिवसीय निषेध मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री बीझेड जमीर अहमद यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी केली.
हे वाचलंत का? : 'सनातन धर्म मंडळ' स्थापन करा; किन्नर समाजाच्या मागणीला जोर
मिळालेल्या माहितीनुसार, कलबुर्गी येथील नागेश्वर शाळेपासून निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी हातात ‘वक्फ हटाओ, अन्नदाता बचाओ’ अशा घोषणांचे फलक घेतले होते. आंदोलनादरम्यान संत सिद्धलिंग स्वामी यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री बीझेड जमीर अहमद यांच्यावर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, राज्यभरातील मठ, मंदिरे आणि शेतकऱ्यांच्या जमिनींना नोटिसा बजावून मंत्र्यांनी जातीय विष पेरले आहे. त्यांची वागणूक एखाद्या मंत्र्यासारखी कमी आणि पाकिस्तानच्या एजंटसारखी जास्त आहे. वक्फ न्यायालये आयोजित करून अल्पसंख्याकांना खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सिद्धलिंग स्वामी यांनी केला.
सिद्धलिंग स्वामी यांनी नमूद केले की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एकदा म्हटले होते की 2047 पर्यंत भारत इस्लामिक राष्ट्र होईल, धार्मिक स्थळे आणि मठ, मंदिरे वक्फ मालमत्तेत रूपांतरित करण्याचा जमीर अहमदचा प्रयत्न हे या दिशेने पहिले पाऊल आहे.