मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर ( Voting in mumbai ) जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०१.०० वाजेपर्यंत अंदाजे २७.७३ टक्के मतदान झाले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील दुपारी ०१.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-
विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)
१७८- धारावी २४.६५ टक्के
१७९- सायन-कोळीवाडा १९.४९ टक्के
१८०- वडाळा ३१.३२ टक्के
१८२-वरळी २६.९६ टक्के
१८४-भायखळा २९.४९ टक्के
१८५- मलबार हिल ३३.२४ टक्के
१८६- मुंबादेवी २७.०१ टक्के