मुंबई : (Prakash Ambedkar) एकीकडे सज्जाद नोमानींनी मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीला मतदान करावं असं व्होट जिहादचे जाहीर आव्हान केले आहे. तर दुसरीकडे "तुमचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित ला द्या", असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला केले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. मोहम्मद पैगंबर बिलाचे कायद्यात रुपांतर करायचे असेल तर मुस्लिम बांधवांनी वंचितला मतदान करावं असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला साद घातली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
"आम्ही असं मुसलमानांना हेच म्हणतो की, यावेळेस तुमचं मतदान मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित ला तुम्ही द्या. ते जर तुम्ही दिलं तर मोहम्मद पैगंबराचे जे बील आहे ते कायद्यात रुपांतर होईल. आणि मग नुपूर शर्मा ही जी महिला आहे, तिने आणि इतर ज्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी वाईट लिहिलं होतं त्यांच्यावर कारवाई करता येईल. त्यामुळे मुसलमानांना माझं आवाहन आहे त्यांनी यावेळेस त्यांचं मत मोहम्मद पैगंबराच्या बिलाला द्यावं" असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.