नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या दौऱ्यावर आहेत. या परिषदेला जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अशातच या राष्ट्रप्रमुखांशी भेट घेत, विविध विषयांवर चर्चा केली आहे. ब्राझील, सिंगापूर, स्पेन, या देशांच्या प्रमुखांशी मोदी यांनी भेट घेतली. भारताने स्विकारलेल्या ' ग्लोबल साऊथ 'च्या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
१. पंतप्रधान मोदी यांनी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष
जो बायडन यांची भेट घेतली. बायडन हे थोड्याच दिवसात अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. बायडन यांच्या सोबतची भेट सुखावणारी आहे अशी प्रतिक्रीया मोदींनी व्यक्त केली.
२. G20 च्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान
जॉर्जिया मेलोनी यांची सुद्धा मोदींनी भेट घेतली. या भेटी दरम्यान, सुरक्षा, तंत्रज्ञान या विषयावर दोघांनी संवाद साधला.
३. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. पॅरीस मध्ये या वर्षी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळ यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल मोदींनी त्यांचे अभिनंदन केले.
४. इंगलंडचे पंतप्रधान
कीर स्टारमर यांच्या सोबत मोदींनी संवाद साधला. इंगलंड आणि भारत यांच्यातील व्यापारातील बोलणी पुन्हा एकदा सुरू करण्याविषयी आपण सकारात्मक आहोत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
५. इंडोनेशीयाचे राष्ट्राध्यक्ष
प्रबोवो सुबिओन्तो यांची सुद्धा भेट मोदी यांनी घेतली आहे. भारत आणि इंडोनेशीया यांच्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्ष पूर्ण झाली असून या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष म्हटली जात आहे.
६. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष
लुला दा सिल्वा यांची भेट मोदी यांनी घेतली. यंदा जी २० परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलकडे आहे. परिषदेच्या तयारीसाठी घेतलेल्या मेहनतीचे मोदींनी कौतुक केले
७. स्पेनचे राष्ट्राध्यक्ष
पेड्रो सांचेझ यांची भेट मोदींनी घेतली. काही काळापूर्वी पेड्रो भारताच्या दौऱ्यावर होते, जिथे अनेक प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं.
८. सिंगापूरचे पंतप्रधान
लॉरेन्स वँग यांची सुद्धा मोदींनी भेट घेतली.
९. पंतप्रधान मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी यांची सुद्धा भेट घेतली.
१०. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांची सुद्धा भेट मोदींनी घेतली.
यंदाच्या वर्षी ' बिल्डींग अ जस्ट वर्ल्ड अँन्ड सस्टेनेबल प्लॉनेट' या विषयावर परिषदेत चर्चा होणार आहे. ज्यामध्ये अफ्रिकन युनियन आणि युरोपीयन युनियन सह १९ सदस्य देशांचा समावेश असणार आहे.