देवेंद्र फडणवीस यांची मिरा-भाईंदरच्या मतदारांना साद
नरेंद्र मेहता यांना मतदान करण्याचे व्हिडिओ क्लिपद्वारे केले आवाहन
19-Nov-2024
Total Views | 53
1
मिरा-भाईंदर : निवडणुकीच्या प्रचाराच्या धावपळीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी अनोख्या पद्धतीने मतदारांना साद घातली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मिरा-भाईंदरच्या मतदारांना एका व्हिडियो क्लिपद्वारे भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
व्हिडिओ क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “गेल्या दहा वर्षांत मिरा-भाईंदर शहराचा सर्वांगीण विकास झाला. पुरेसे पाणी, रस्ते, मेट्रो या सारख्या प्रगतीच्या वाटचालीसाठी माझ्यासोबत सातत्याने असलेले आणि त्याची मागणी व पाठपुरावा करणारे महापौर ते आमदार राहिलेले नरेंद्र मेहता हे भाजप व महायुतीचे उमेदवार आहेत. मिरा-भाईंदर शहर अधिक प्रगतशील करण्यासाठी त्यांना बहुमताने निवडून द्या,” अशी विनंतीही फडणवीस यांनी या क्लीपच्या माध्यमातून केली आहे.