निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे चौकशी करावी : विनोद तावडे

    19-Nov-2024
Total Views |
 
Vinod Tawade
 
मुंबई : निवडणूक आचारसंहितेच्या काही गोष्टी सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. तरीसुद्धा निवडणूक आयोगाने निष्पक्ष पद्धतीने चौकशी करायला हवी, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली आहे. मंगळवारी विरामधील विवांत हॉटेलमध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. मात्र, तावडेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
विनोद तावडे म्हणाले की, "वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजप उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला."
हे वाचलंत का? -  काँग्रेसच्या महिलाविरोधी धोरणाचा आणखी एक नमुना उघड!
 
"हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी," अशी मागणी विनोद तावडे यांनी केली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121