ब्राझील मध्ये भारतीय समुदायाकडून मोदींचे संस्कृत मंत्राद्वारे स्वागत
18-Nov-2024
Total Views | 49
ब्राझिलिया : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचा दौरा करत आहेत. नायजेरिया सारख्या देशाने त्यांना सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव सुद्धा केला होता. अशातच ब्राझील मधल्या रिओ दि जानेरोच्या विमानतळावर उतरल्यानंतर मोदी यांचे स्वागत वेदमंत्रांद्वारे करण्यात आले. ब्राझीलच्या वैदिक पंडितांनी मंत्रांचे उच्चार करत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
दिनांक १९ व २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जी २० शिखर परिषदेला मोदींना हजेरी लावली आहे. विविध देशांतील नेत्यांसोबत चर्चा करून ही परिषद यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरीका, चीन या सारख्या देशांचे नेते या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जागतीक पटलावर ' ग्लोबल साऊथ' चा अजेंड आपण जगासमोर ठेवण्यात यशस्वी झालो आहेत. या पार्श्वभूमीवर पुढच्या कामाची सुरूवात आपण करणार आहोत असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. १७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी नायजेरीयाला भेट दिली. नायजेरियाच्या त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजरने सन्मानित करण्यात आले आहे.
रिओ दि जानेरोच्या विमानतळावर झालेल्या त्यांच्या स्वागतावर प्रतिक्रीया देताना मोदी म्हणाले की हा उत्साह पाहून
मनाला आनंद झाला. आपण सगळे देश आणि खंड यामुळे जरी दूर असलो तरी ही उर्जा आपल्याला या नात्याने बांधून ठेवते.