कट्टरपंथी शादाबने वंचित कुटुंबावर सुतळी बॉम्ब फेकत केला उन्माद
कट्टरपंथींच्या छाळामुळे वंचित कुटुंबावर स्थलांतरण करण्याची वेळ
18-Nov-2024
Total Views |
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका वंचित असलेल्या कुटुंबाने त्यांच्या घरासमोर स्थलांतराचे पोस्टर चिकटवले आहेत. पोस्टरमध्ये मुस्लिम छळ हे स्थलांतराचे कारण सांगण्यात आले आहे. एका जुन्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी काही कट्टरपंथींकडून पीडितांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शादाब असे एका मुख्य आरोपीचे नाव असून त्यांच्या घरावर सुतळी बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता रविवारी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून हिंदू संघटनांच्या निषेधानंतर पोलिसांनी ७ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रासरमाध्यमानुसार, इंदूरच्या बाग कॉलनी येथे ही घटना घडली आहे. राजेश कलमोईया असे पीडित हिंदूचे नाव असून आपल्या कुटुंबासह येथे राहत असून घराशेजारी अंड्याचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याद्वारे राजेश हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. महिनाभराआधीच वसाहतीत असणाऱ्या पाइपलाईनचे काम सुरू असता राजेशचा त्याच्या शेजारी राहणाऱ्या शादाब सानूसोबत सुमारे एकूण ४० वर्षांपासूनचा वाद पुन्हा उफळला असल्याचे सांगितले आहे. ज्यात सांगण्यात आले की, शादाब सतत राजेशकडे पाहत होता यावरून आता दोघांमध्ये शाब्दिक हल्ल्यासह बाचाबाची झाली असल्याचे वृत्त आहे.
यावेळी शादाबने राजेशला शिवीगाळ करत धमकीही देिली होती. त्यानंतर, राजेशच्या तक्रारीवरून, शादाब सानूविरोधात वंचित आणि बहुजन समाजाच्या कायदयांसह कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणात तोडगा कडण्यासाठी शादाब राजेश आणि त्याच्या कुटुंबावर सतत दबाव टाकला जात होता. त्याला शादाब आणि त्याच्या कुटुंबाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी घटनास्थळी असणाऱ्या काही कट्टरपंथी युवकांनी राजेशच्या पत्नीकडे जाऊन तिच्यावर दबाव आणला होता.
मात्र, राजेशने याप्रकरणी गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. शनिवारी मध्यरात्री ३ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्याच्या घरानजीक स्फोट झाल्याचे त्यांना समजले. राजेश त्यांची पत्नी मीनाक्षीसोबत बाहेर गेला असता, त्याला शेजारी रईस उभा असल्याचे दिसले होते. विचारणा करूनही रईसने हल्ला करणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीही एक माहिती दिली नाही. त्यावेळी राजेशची पत्नी मिनाक्षीने बॉम्बचा स्फोट होताना पाहिले असता त्यावेळी तिने आपल्या पतीला आत ओढले.
थोडा उशीर झाला असता, तर या सुतळी बॉम्बमुळे तो भाजला असता, असे राजेशने सांगितले होते. शनिवारी घडलेल्या घटनेला कंटाळलेल्या राजेशने त्याच्या घराबाहेर स्थलांतर करण्याचे पोस्टर चिकटवण्यात आले. पोस्टरमध्ये त्यांनी लिहिले की, "हे घर विक्रीसाठी आले आहेत, मुस्लिम छळामुळे त्रस्त झाले आहेत. याप्रकरणाची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते राजेशच्या घरी आले असता त्यांनी शादाब आणि त्याच्या साथीदारांवर कारवाईची मागणी केली आणि आंदोलन छेडले.
राजेशच्या घरी झालेल्या स्फोटात सुतळी बॉम्ब आणि खिळे वापरण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनेच्या सदस्यांनी केला आहे. याप्रतरणाची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता श्वान पथकही दाखल झाले होते. त्यावेळी शादाब सानूला पाठिंबा देणारेही तेथे पोहोचसले असता त्यांनी, राजेशचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. पोलिसांनी इतर जमावाल हितगूज करत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी इंदूर पोलिसांनी एकूण ७ आरोपींवर एफआऱआय दाखल करत गुन्हा दाखल केला आहे.