विकासकामे करण्यासाठी पैशांची नव्हे तर इमानदार नेत्यांची गरज - नितीन गडकरी

ठाण्यात भाजप महायुतीच जाहीर सभेला उसळला जनसागर

    17-Nov-2024
Total Views | 43
Nitin Gadkari

ठाणे : साठ वर्षात काँग्रेस करू शकले नाही ते दहा वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने करून दाखवले.तेव्हा, विकास कामे करण्याकरीता पैशांची नाही तर इमानदार नेत्यांची गरज आहे. असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी करून उपहारगृहात चवीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी चांगल्या डॉक्टरांकडे जाताना जात पाहत नाही, मग निवडणूकीत आपण जात का बघतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्यासह कोपरी- पाचपाखाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा- माजिवड्यातील प्रताप सरनाईक, मुंब्रा कळवाचे राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची सभा रविवारी (ता.१७ नोव्हे.) ठाण्यातील गावदेवी मैदानावर पार पडली. यावेळी, केळकर व सरनाईक यांच्यासह शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, मा. खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, आ. निरंजन डावखरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नारायण पवार, ॲड. सुभाष काळे, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ मा. नगरसेवक देवराम भोईर, आरपीआयचे शहराध्यक्ष भास्कर वाघमारे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या माध्यमातुन होत असलेल्या भारतातील दिल्ली - मुंबई,वडोदरा - मुंबई महामार्गासह विविध रस्तेमार्ग आणि विकास प्रकल्पाचे व्हिजन मांडुन वाहतुकीसाठी दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट करीत ना. नितीन गडकरी यांनी, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. या ७५ वर्षाच्या इतिहासामध्ये ६० वर्षे राज्य करण्याची संधी काँग्रेसला मिळाली.पण, चुकीच्या धोरणामुळे आणि नियोजन चुकल्याने अपेक्षित विकास झाला नसल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.सध्या आपण अमेरिका चीन पाठोपाठ तिसऱ्या नंबरला आहोत. पुढील काळात जगात एक नंबरला जायचे आहे.जगात सर्वाधिक यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅन पॉवर हिंदुस्थानमध्ये आहे. देशाचे पोटेन्शिअल लक्षात घेता देशात पैशाची कमी नाही. विकास कामे करण्याकरता पैशाची नाही तर इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची गरज आहे. योग्य नेतृत्व असले पाहिजे आणि देशाकरीता काम करण्याची प्रामाणिक इच्छा आणि मनोभूमिका असली पाहिजे. त्यामुळे ६० वर्षात जे काँग्रेस पार्टी करू शकले नाही. ते १० वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने करून दाखवले असुन त्यामुळेच आज महाराष्ट्र देखील प्रगती आणि विकासाच्या बाबतीत पुढे जात असल्याचे सांगितले.

देशात महाराष्ट्राला पहिल्या नंबरचे राज्य करण्याकरीता तसेच जनतेचा सुखांक (हॅपीनेस इन्डेक्स) वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. तेव्हाच ठाण्याचाही शाश्वत विकास साधता येईल. असेही गडकरी म्हणाले.

संविधान बदलण्याची हिंमत नाही

लोकसभेला मोठ्या प्रमाणात जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचे विष पेरून आणि संविधान बदलाचा दुषप्रचार केला गेला. पण आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणाला बदलु देणार नाही किंबहुना संविधान बदलण्याची कुणात हिंमत नाही.

कोंडी आणि प्रदुषणावर जलवाहतुकीचा पर्याय
 
ठाणे शहरात ५५ उड्डाणपुल बांधुनही वाहतुक कोंडी कमी झाली नाही. अशी खंत व्यक्त करून ना. गडकरी यांनी घोडबंदर रोडचे उदाहरण देऊन मुंबई- ठाण्यात जलप्रदुषण, वायु प्रदुषण आणि ध्वनी प्रदुषणाचा विळखा वाढत असल्याचे सांगितले. तेव्हा, येणाऱ्या काळात वाहतुक कोंडी आणि हवा प्रदुषणापासुन मुक्ती मिळण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देऊन जेएनपीटीला येणारा माल पाण्यातून बीपीटीला आणला तर कोंडीसह प्रदुषणालाही आळा बसेल. या पाश्वभूमीवर नवी मुंबईतील विमानतळ हे वॉटर टॅक्सीने जोडण्यात येणार असल्याने प्रवासाचा कालावधी कमी होणार असल्याचे त्यांनी सांगिताले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121