नायजेरियातील 'मराठी' समुदायाकडून मोदींचा सत्कार!

    17-Nov-2024
Total Views | 45

modi mm

अबुजा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जाचा मिळाला. केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर, सातासमुद्रपार या गोष्टीचं कौतुक झालं. अशातच, आता पंतप्रधान मोदी नायजेरीयाच्या दौऱ्यावर असताना त्यांचं तिथल्या मराठी भाषीकांनी कौतुक केलं. या बद्दल माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडीया प्लॅटफॉर्म 'X' वर आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी सध्या ३ देशांच्या ग्लोबल साऊथ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात १६ ते २१ नोव्हेंबर दरम्यान नायजेरिया, ब्राझील, गयाना या तीन देशांना भेट देणार नाही. १७ नोव्हेंबर रोजी मोदी नायजेरियात अबुजा येथे पोहोचले. गेल्या १७ वर्षांच्या इतिहासात पश्चिम अफ्रिकेला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या आगमनानंतर नायजेरीयाचे राष्ट्रपती बोला अहमद तिनूबु यांनी मोदींचे स्वागत केले. यावेळेस विमानतळावर जमलेल्या मराठी समुदायाने पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी या बद्दल आनंद व्यक्त करत म्हणाले " नायजेरियातील मराठी समुदायाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते आपल्या संसकृतीशी जोडले गेले आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहे."

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, मराठी सह प्राकृत, पाली, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला.



अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121