पंतप्रधान मोदी यांची सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना भेट
सोयाबीनला मिळणार प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांचा हमीभाव
16-Nov-2024
Total Views | 82
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यावर लगेचच सोयाबीनला सहा हजार प्रतिक्विंटल भाव देण्याची घोषणा केली आहे. शेतकर्यांच्या पिकाला योग्य भाव नसल्याची ओरड विरोधक कायमच करत असतात. पंतप्रधान मोदींच्या घोषणेने विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून घेतली आहे.
राज्यात नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची लागवड करत असतो. महाराष्ट्रात विदर्भात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. पश्चिम विदर्भात ७० ते ८० दशलक्ष रुपयांचे उत्पादन सोयाबीनचे घेतले जाते. त्यामुळे या भागातील दिवाळीनंतरची शेतकर्याची अर्थव्यवस्था याच पिकावर अवलंबून असते. या पिकाला आधार म्हणून महायुती सरकारने पाच हजार रुपयांची मदत याआधीच जाहीर केली होती. तसेच, योग्य हमीभाव न मिळाल्यास विक्री किंमत आणि हमीभावातील फरकाची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीन पिकाला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करून, सोयाबीन उत्पादक शेतकर्याला दिलासा दिला आहे.
महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास सोयाबीन पिकाला सात हजार रुपये हमीभाव देण्याचे वचन दिले आहे. राहुल गांधींनीही शेतकर्यांच्या नावे गळे काढताना सोयाबीनला भाव नसल्याचे बोलून दाखवले होते.
मात्र, ज्या कर्नाटकमध्ये काँग्रेसशासित राज्यात सोयाबीन उत्पादक शेतकर्याला क्विंटलला पाच हजार रुपयेसुद्धा भाव मिळत नाही, तिथे राहुल गांधी याबाबत का बोलत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.