ठाण्यात मतदान केंद्राच्या स्वच्छतेसाठी सर्वकष मोहिम

    16-Nov-2024
Total Views | 26
Voting

ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान ( Voting ) होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत, शनिवारी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभागातील सर्व मतदान केंद्रे, १०० मीटरचा परिसर, नजिकची सार्वजनिक शौचालये, पदपथ, मतदान केंद्राकडे येणारे रस्ते, चौक, दुभाजक यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी मतदान करण्याची शपथही घेण्यात आली.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशाने घनकचरा व्यवस्थापन विभाग ही सफाई करीत आहे. एकूण ३६७ ठिकाणी १५२८ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी १३९० कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. उद्या, रविवार, (१७ नोव्हें) रोजी मानपाडा-माजिवडा, वर्तकनगर, उथळसर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे. तर, सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी नौपाडा-कोपरी, वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर- सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121