पीएम किसान सन्मान योजनेच्या पैशातून दहशतवाद्यांनी केली शस्त्रांची खरेदी

खरेदी केलेले शस्त्रे पोलिसांकडून जप्त

    16-Nov-2024
Total Views | 75
 
Al Qaeda Terrorist
 
नवी दिल्ली : अल कायदाचे दहशतवादी (Al Qaeda Terrorist) काही दिवसांआधी अटक करण्यात आले होते. पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे जिहादासाठी वापरायचे होते, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये २ लोक पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत आणि त्यांनी सरकारकडून शेतमालासाठी मिळालेल्या पैशातून शस्त्रे खरेदी केली होती.
 
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, झारखंड आणि राजस्थानमधून पकडलेल्या अल कायदा मॉड्यूलच्या दहशतवाद्यांच्या तपासात हे सत्य माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल याप्रकरणाचा तपास करत आहे. नुकतीच त्यांनी न्यायालयाला माहिती दिली आहे.
 
दहशतवाद्यांच्या सांगण्यावरून आणखी काही लोकांनी पीएम-किसान योजनेचे फॉर्म भरल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. एवढं मोठे नेटवर्क तयार करून ते सरकारकडून मिळालेल्या पैशाचा वापर दहशतवादाला आर्थिक मदत करण्यासाठी करत असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. दिल्ली पोलीस याप्रकरणाचा शोध घेत आहेत.
 
दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या ११ पैकी ८ दहशतवाद्यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने ६ दिवसांची कोठडी मागितली होती, दिल्ली पोलिसांनी न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणातील साक्षीदाराने दहशतवादात आणखी लोक सामील झाले आहेत. याप्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. . न्यायालयाने १२नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 
पीएम-किसान योजनेंतर्गत, अल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रति वर्ष रूपये ६००० दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. ही योजना २०१९ मध्ये आणली गेली होती. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्यावरील खर्च कमी करण्यासाठी सरकारने योजना सुरू केली होती. मात्र आता त्याचा स्वत:च्या स्वार्थासाठी गैरवापर केला आहे.
 
याप्रकरणी पोलिसांच्या स्पेशल सेल आणि एटीएसने २२ ऑगस्ट २०२४ रोजी रांची आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात आता डॉ. इश्तियाक आणि त्याचे साथीदार दहशतवादी इनामुल अन्सारी, शाहबाज अन्सारी, मोतीउर रहमान आणि अल्ताफ यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता राजस्थानात छापे टाकण्यात आले आहेत. राजस्थानमधील छाप्यात अनामूल, शाहबाज, अल्ताफ, अर्शद, हसन आणि उमर यांना अटक करण्यात आली. तो राजस्थानमधील भिवडी येथे शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण घेत होता.
 
याप्रकरणात सुरक्षा यंत्रणांनी एके ४७ रायफल, पॉइंट ३८ बोअर रिव्हॉल्वरसह सहा जिवंत काडतुसे, ३२ बोअरची ३० जिवंत काडतुसे, डमी इन्सान, एअर रायफल, लोखंडी पाइप, ग्रेनेड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
 
टँकी डॉक्टर इश्तियाक फिदाईन दहशतवादी पथक तयार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. इश्तियाकने यासाठी डोंगराळ भाग निवडला होता. येथे तो आपल्या साथीदार दहशतवाद्यांना आणून त्यांना हल्ल्याचे प्रशिक्षण देणार होता, अशी माहिती देण्यात आली आहे. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121