अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? वाचा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

    15-Nov-2024
Total Views | 48

dcm
 
मुंबई : (Devendra Fadnavis)अमित ठाकरेंना पाठिंबा देणे, आता शक्य नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर, उबाठाचे महेश सावंत तर मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने माहीममध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
 
मुलाखतीदरम्यान याविषयी प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेला आम्ही पाठिंबा देऊ, अशी आमची सुरुवातीला भावना होती. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही यावर एकमत झाले होते. मात्र त्यांच्या पक्षातील आमदार असलेल्या उमेदवाराचे म्हणणे होते की जर आपण ही जागा लढलो नाही तर त्याचा फायदा अमित ठाकरे यांना होण्याऐवजी ठाकरे गटाच्या उमेदवाराला होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.
 
"त्यामुळे या सगळ्याचा दबाव मुख्यमंत्र्यांवर होता. अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यायला हवा होता, या मताचा मी आजही आहे. मात्र आघाडी वा महायुतीमध्ये जो मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो, तोच आघाडी वा महायुतीचा असतो." असेही ते पुढे म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

Waqf Board गुजरात राज्यातील असलेल्या अहमदाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) कोट्यवधि दुकानाच्या जमिनीवर अवैधपणे दुकाने बांधली होती. यावरून संबंधितांनी वक्फचे विश्वस्त असल्याचा दावा केला आणि दुकाने भाड्याने दिली आणि २० वर्षांपूर्वीचे असलेले भाडे वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित भाडे हे वक्फ बोर्डाच्या खात्यावर जाण्याऐवजी पाच व्यक्तींच्या खिशात जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित प्रकरणाची माहिती ही वक्फ बोर्डाला कळाल्याची माहिती तक्रारीत नमूद केले होते. मात्र, तरीही कारवाई करण्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121