१५ मिनिटांचे एकच उत्तर १०० टक्के मतदान! संभाजीनगरच्या मतदारांनी दिलं चोख प्रत्युत्तर
भव्य फलक लावत केले मतदारांना आव्हान
13-Nov-2024
Total Views | 45
संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच सध्या संभाजीनगर येथे एका बॅनरची चर्चा आहे. संभाजीनगर येथे भाजप विरूद्ध एमआयएममध्ये टक्कर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजीच्या माध्यमातून १५ मिनिटांचे शंभर टक्के मतदान करा असे उत्तर देण्यात आहे. अकबरूद्दीन ओवैसींनी केलेल्या एका विधानावरून हे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात बॅनर लावण्यात आला आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंधरा मिनिटे द्या, सर्व बहसंख्य असलेल्यांचा सुपडासाफ करतो अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. काही दिवसांआधी संभाजीनगर येथे ओवैसी यांची सभा झाली होती त्या सभेमध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून बॅनरबाजी केली आहे. मात्र हा बॅनर कोणी लावला आहे त्याची अद्यापही माहिती आता समोर आलेली नाही.
संभाजीनगर पूर्व येथे छत्रपती संभाजीनगर हे निवडणुकीच्या रिंगणात असून भाजपकडून अतुल सावे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँटे की टक्कर असणार आहे. अशातच आता या बॅनरकडे अनेकांचे लक्ष वेधण्यात आले आहे.