सेक्युलर आणि मुस्लिम पक्षांमुळे देशात गृहयुद्धाची भीती - विहिंप
वर्षभरात हिंदूंचे सण आणि मंदिरांवर जिहादी हल्यांच्या ३०० घटना
13-Nov-2024
Total Views | 25
नवी दिल्ली : ( Jihadi Attacks on Hindu Festivals )वर्षभरात देशात हिंदूंचे सण आणि मंदिरांवर जिहादी हल्ल्यांच्या ३०० हून अधिक घटना घडल्या आहेत. या घटनांना पाठबळ देणाऱ्या सेक्युलर आणि मुस्लिम राजकीय पक्षांमुळे देशात गृहयुद्ध भडकू शकते, अशी भीती विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) मंगळवार दि.१२ नोव्हेंबर रोजी व्यक्त केली आहे.
हिंदूंवर होत असलेल्या जिहादी हल्ल्यांची यादी विहिंपचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी जारी केली. यावेळी ते म्हणाले, जानेवारी २०२३ ते २०२४ सालच्या छठपूजेपर्यंत हल्ले आणि अत्याचाराच्या ३०० घटनांची यादी जारी करण्यात आली आहे. मात्र, या काळात झालेल्या अत्याचार आणि हल्ल्यांपैकी केवळ एक दशांश घटनांचीच यादी करण्यात आली आहे. या हल्ल्यांचा रानटीपणा आणि क्रौर्य केवळ अमानवीच नाही, तर त्यांचे प्रकार मानवी कल्पनेपलीकडचेही आहेत. संपूर्ण जग दहशतवाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद, लोकसंख्या जिहादने त्रस्त आहे. त्यानंतर आता ट्रेन जिहाद, युरिन जिहाद या माध्यमातून गैरमुस्लिमांबद्दलचा मुस्लिमांचा द्वेष समोर येत आहे.
जिहादी हल्ले आणि अत्याचारांची दहशत विश्वव्यापी असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतातील अनेक मौलाना आणि मुस्लिम नेते हिंदू समाजाला ज्या प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत ते त्यांच्या जिहादी मानसिकतेला अनुरूप आहेत. मात्र, या प्रकाराविषयी सेक्युलर समाजाचे मौन धक्कादायक आहे. भारतातील तथाकथित सेक्युलर मुस्लिम पक्ष आणि नेते सत्तेच्या लालसेपोटी जिहाद्यांच्या हिंसक प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे देशात गृहयुद्ध भडकू शकते. त्यामुळे जिहाद्यांना संरक्षण देण्याची नव्हे तर धडा शिकवण्याची वेळ आल्याचेही डॉ. जैन यांनी यावेळी नमूद केले आहे.