मुंबई : ( Raj Thackeray )राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच टीसचा एक धक्कादायक अहवाल सध्या खूप चर्चेत आहे. या अहवालाची राजकीय वर्तुळातही बरीच चर्चा झाली. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागाठाणे मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना या अहवालावर भाष्य केले.
काय म्हणाले राज ठाकरे?
"तुमच्या जीवाचं काही पडलेलंच नाही यांना. एक रिपोर्ट आलाय आणि त्या रिपोर्टमध्ये असं दिलेलं आहे, खासकरुन मुंबईमध्ये आता असलेल्या आणि येत असलेल्या बांगलादेशी मुसलमानांचे आणि म्यानमारमधून येणाऱ्या रोहिंग्यांचे प्रमाण हे इतकं वाढणार आहे की याच्यानंतर मुंबईमधील हिंदूंचा टक्का ५०% पेक्षा खाली येणार आहे." असे त्यांनी अधोरेखित करुन सांगितले.
"माणुसकीच्या नावाखाली आम्ही रोहिंग्यांना आत घ्यायचं, बांगलादेशीयांना आत घ्यायचं, जर मग आतमध्येच घ्यायचं असेल तर बांगलादेशांमध्ये राहणाऱ्या, अत्याचार होणाऱ्या हिंदूना आतमध्ये घ्या", असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.