"सुन लो ओवैसी, छत्रपती संभाजीनगर... किसी का बाप भी...", देवेंद्र फडणवीसांचा ओवैसींवर घणाघात
12-Nov-2024
Total Views |
छत्रपती संभाजीनगर : ( Devendra Fadnavis )"सुन लो ओवैसी, छत्रपती संभाजीनगर... किसी का बाप भी पैदा हुआ तो अब ये नाम नही बदल सकता...", अशी गर्जना करत देवेंद्र फडणवीसांनी एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींना खुले आवाहन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. ९ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना सुरुवातीलाच छत्रपती संभाजीनगर या नावावर भर देत त्यांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"सुन लो ओवैसी, छत्रपती संभाजीनगर... किसी का बाप भी पैदा हुआ तो अब ये नाम नही बदल सकता... काल एमआयएमची सभा झाली. त्या सभेमध्ये एक महिला होती, ती महिला म्हणाली, ये कौन संभाजी राजा है, ये कैसे संभाजीनगर हो गया, अरे त्यांना माहिती नाही, 'देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था', ज्या संभाजी राजांना पकडण्यासाठी औरंगजेब या संभाजीनगरमध्ये येऊन बसला पण ९ वर्षे त्यांना झुंजवत ठेवलं. एकही लढाई संभाजी महाराज हरले नाहीत. जर फितुरी झाली नसती तर कधीच औरंगजेबाच्या हाती आमचे संभाजी महाराज आले नसते", असे फडणवीसांनी ठणकावून सांगितले.
“औरंगजेबाचं नाव या शहराला कधीच राहू नये, म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारने परमप्रतापी संभाजी महाराजांचे नाव या शहराला दिलं आहे. पण ज्यांचे मनसुबे रझाकारांचे राज्य आणण्याचे आहे. त्यांना सांगतो की आम्ही जागे झालो आहोत. ही निवडणूक एकजूट दाखवण्याची आहे. आपण धर्मयुद्ध करू. देव, देश आणि धर्म काय आहे? हे संभाजीनगरकरांनी दाखवून द्यायला हवं”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.