मुंबई : एकाबाजूला माझे हिंदुत्व हे वेगळे आहे आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे असे अनेक मुस्लिम बांधवांना वाटते असे वक्तव्य भरसभेत उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र आता यापार्श्वभूमीवर महायुतीने उद्धव ठाकरे सरकारच्याकाळात केलेल्या कामांवर सवाल उपस्थित केले आहेत. उद्धव ठाकरे सरकार असताना कोरोनाकाळात दुकाने चालु करण्यात आले होते, मात्र मंदिर बंद ठेवण्यात आल्याने उद्धव ठाकरे सरकारवर टीका करण्यात आल्या होत्या.
काही वर्षांआधी देशात कोरोना महामारीचे संकट ओढावले होते. यामुळे राज्यातील या माहामारीने अनेक लोक बेहाल झाले होते. मात्र यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात घरात बसून जनतेच्या रक्षणाकडे कानाडोळा केला असल्याची टीका भाजपने केली होती.
एवढेच नाहीतर उद्धव ठाकरे सरकारच्या कोरोनाकाळात दारूची दुकाने, बारही सुरू होते, दुसऱ्या बाजूला मंदिर बंद ठेवण्यात आल्याने समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला जात आहे. आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्या सरकारकाळात केलेल्या कामाला हिंदूद्वेषी म्हटले आहे. कारण उद्धव ठाकरे सरकारकाळात हिंदूंची धर्मस्थळे बंद करण्यात आली असल्याने भाजपने उद्धव ठाकरे सरकारला हिंदू धर्माचे विरोधी म्हटले आहे.