मोठी बातमी! अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर; केंद्र सरकारची मंजूरी
04-Oct-2024
Total Views | 112
मुंबई : अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे यापुढे अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे.
मागील काही काळापासून अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याबाबत प्रयत्न सुरु होते. यापूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामांतर करण्यात आले आहे. अहील्यानगर नामकरण करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.