तेहरान : इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर असंख्य क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर आता २६ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलने जबरदस्त पलटवार केला आहे. अशातच इराणची महत्त्वाची लष्करी केंद्रे उद्ध्वस्त केली होती. आता इस्त्रायलने केलेल्या जबरदस्त हल्ल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात इराणवर इस्त्रायलने क्षेपणास्त्र डागत शाहरौद स्पेस सेंटर उद्धवस्त झाली आहे.
इराणमधील शाहदौर स्पेस सेंटरच्या उपग्रहाचे फोटो व्हायरल होत आहे. त्यात स्पेस सेंटरची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली दिसत आहे. या हल्ल्यात इस्त्रायलने इराणवर तब्बल २०० हून अधिक क्षेपणास्त्र डागले होते. त्यातील बहसंख्य क्षेपणास्त्र याच ठिकाणाहून डागण्यात आल्याची माहिती आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात झालेल्या या नुकसानीबद्दल इराण सरकारकडून कोणतेही वक्तव्य केले गेले नाही, अशी माहिती सांगण्यात आली आहे.
दरम्यान इराणवर झालेल्या हल्ल्यात इराण मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे. मात्र इराणवर किती नुकसान झाले याची ठोस माहिता सांगता येणे कठिण आहे. या हल्ल्यात इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ८० टक्के इंधनाचे नुकसान झाले.
दरम्यान या हल्ल्यात इराणचे नुसकसान झाले आहे. मात्र किती नुकसान झाले याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. त्यावर अंदाज लावणे कठिण आहे. शाबरौद बेस तेहरानपासून ३७० किमी लांब उत्तर-पूर्व भागात आहे. त्याच ठिकाण इमाम खमैनी स्पेस खमैनी सेटरसुद्धा आहे. या केंद्राची सर्वात मोठी इमारत या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आली आहे.