कल्कीमधील प्रभासला 'जोकर' म्हणत वाद ओढावला, आता ‘स्त्री २’ बद्दल अर्शदचं विधान आलं चर्चेत

    30-Oct-2024
Total Views | 18
 
arshad
 
 
मुंबई :’ मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ या चित्रपटातील सर्कीट हे पात्र आजही प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे. त्या चित्रपटामुळे एक नवी ओळख मिळवणारा अभिनेता अर्शद वारसी याने काही दिवसांपूर्वीच ‘कल्की’ चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला जोकर म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा त्याने आणखी एका चित्रपटावर भाष्य करत लोकांचे कान स्वत:कडे वळवले आहेत. ‘स्त्री २’ चित्रपटाबद्दल अर्शदने आपले मत एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
 
मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आतापर्यंत आवडलेला शेवटचा चांगला चित्रपट कोणता असा प्रश्न विचारला असता अर्शदने राजकुमार आणि श्रद्धाचा स्त्री २ हा चित्रपट असल्याचे सांगितले. अर्शद म्हणाला की, “मी स्त्री २ पाहिला. मला तो खूप आवडला. मला राजकुमार राव खूप आवडला. तो चांगला अभिनेता आहे. जेव्हा पैशाचा चांगला वापर होताना दिसतो तेव्हा मला खूप आनंद होतो. तुम्ही चित्रपटावर एवढे पैसे खर्च करता आणि त्यानंतर तो चित्रपट लोकांनाही आवडतो हे उल्लेखनीय आहे”.
 
दरम्यान, ‘स्त्री’ चित्रपटाच्या पहिल्या भागानेही प्रेक्षकांची मने जिंकली होती. आणि त्यानंतर ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडित काढत ६०० कोटींचा टप्पा पार केला होता. ‘स्त्री २’ चे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले असून यात राजकूमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही भूमिका आहेत.
 
‘कल्की 2898’ या चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेवर जोकर अशी प्रतिक्रीया दिल्यामुळे अर्शद वारसी चर्चेत आला होता. हा चित्रपट पाहून तो निराश झाल्याचंही त्यानं सांगितलं. अर्शद कल्की बद्दल म्हणाला होता की, “मी पाहणारा प्रत्येक चित्रपट मला आवडणार असेल असे मी ठरवले होते. पण कल्की चित्रपटानं निराशा केली”.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121