भिवंडीत संशयित वाहनात ऐवज आढळला

३ लाख ३१ हजारांचा विनातपशील मुद्देमाल जप्त

    28-Oct-2024
Total Views | 17

Bhiwandi
ठाणे :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये रू. ३ लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणीदरम्यान सादर न केल्याने भरारी पथकाने हा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
 
भिवंडी पश्चिमचे भरारी पथक क्र. ७ व नारपोली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत रविवारी पहाटे ३ वाजता एक संशयित वाहन ताब्यात घेण्यात आले. या वाहनामध्ये असलेल्या सामानाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक व गाडीतील इतर कर्मचाऱ्याना सामानाबाबत कोणतीही माहिती देता न आल्याने पोलिसांनी ही गाडी नारपोली पोलीस ठाण्यात आणली.
 
पोलीस व भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीतील साहित्य कुरिअर एजन्सीच्या मालक व पंचासमक्ष गाड़ीतुन उतरावला. संशयित वाहनात एकुण ७३ छोटे मोठे बॉक्स होते. यातील ७२ बॉक्समध्ये २ कोटी ८ लाख १७ हजार ८२० रुपये किमतीचा सोने, चांदी व गिफ्ट आर्टिकल असा मुद्देमाल होता. तपासणी दरम्यान संबंधित कुरिअर चालकाने ६० बॉक्समधील ऐवजांची बिले सादर केली. उर्वरित बॉक्समध्ये असलेल्या रू.३ लक्ष ३१ हजार ६०९/- चा मुद्देमाल ज्यात चांदी व चांदीचे काम असलेले गिफ्ट आर्टिकलचे बिल संबंधिताना सादर करता आले नाही. याबात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121