सुपरस्टार 'विजय'ची तमिळनाडूच्या राजकारणात दमदार एंट्री!
27-Oct-2024
Total Views | 29
चेन्नई : जोसेफ विजय चंद्रशेखर म्हणजेच थालापती विजय हा करोडो लोकांच्या गळ्यातला ताईत. तामिळ चित्रपट सृष्टीत स्व:ताची वेगळी ओळख निर्माण करणारा विजय आता राजकारणाच्या आखाड्यात आपली चमक आजमावून बघणार आहे. विजयने तमिलगा वेत्री कळघम (TVK) हा स्व:ताचा पक्ष काढला आहे. याच पक्षाच्या पहिल्यासभेत जवळपास ३ लाख लोकांना विजय संबोधित करणार आहे.
विक्रवंडी या सभास्थळी शेकडो लोकंचा समूह आपल्या सुपरस्टारला ऐकण्यासाठी दाखल झाले आहेत. एमजी रामचंद्रन (एमजीआर), जे जयललिता, यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत विजय आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात करत आहेत. विजय यांच्या सभेला येत असलेल्या लोकांपैकी ८० टक्के जनसमुदाय हा युवकांचा आहे. अफाट लोकप्रियतेचा जोरावर विजय तामिळनाडूच्या राजकारणत काय परिवर्तन घडवतील याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे.
विजयचे चाहते आतापासूनच तामिळनाडूचे मेगास्टार-मुख्यमंत्री, MGR यांच्याशी त्याची तुलना करत आहेत, ज्यांनी १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या स्टारडमचा राजकारणात यशस्वीपणे फायदा करून घेतला. विजयच्या पक्षाच्या धोरणात सर्वसमावेशकता आणि तमिळ प्रादेशिक अस्मिता यावर भर दिला आहे. विजय त्यांच्या पक्षाच्या लक्ष्याविषयी स्पष्ट आहेत - तामिळनाडूमधील २० ते ३० टक्के मतदार जे दोन प्रबळ द्रविडीयन पक्षांशी अलिप्त राहतात, ज्यात तरुणांचा मोठा भाग आहे अशा मतदारांना ते त्यांच्या बाजूने वळवण्याच्या तयारीत आहेत.